Chief Minister inaugurates renovation of Anasuyabai Kale Memorial House and Working Women and Girls Hostel : अनसूयाबाई काळे स्मृती सदन व वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्या नूतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Nagpur : आपला समाज इतिहास विसरतो आणि इतिहास विसरण्याची हीच वृत्ती आपल्याला कधीकाळी गुलामगिरीत ढकलणारी ठरली. त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास कधीही विसरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन व पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज (15 नोव्हेंबर) झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला अँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जातीयतेविरोधात ठाम भूमिका घेऊन आमदारकीचा राजीनामा देण्याचा इतिहास अनसूयाबाई काळे यांनी घडवला. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही प्रेरणादायी आहेत. देशाच्या पहिल्या संसदेत नागपूरचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळालेल्या अनसूयाबाई या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा हक्काचा आवाज होत्या.
Winter Session : नागपुरात 28 नोव्हेंबरपासून विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू !
अनसुयाबाई यांच्या लेखनात व विचारांत पुरोगामी दृष्टी, सुधारक भूमिका आणि दृढ परिवर्तनवादी दृष्टिकोन स्पष्ट जाणवतो. फडणवीस म्हणाले, नागपूर शहराला अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा आशीर्वाद लाभला आणि त्यापैकी अनसूयाबाई एक तेजस्वी व्यक्तीमत्त्व आहेत. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या या महान स्त्रीच्या स्मृती जपणे ही आपली जबाबदारी आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे यांनी अनसूयाबाईंच्या कार्याचा आढावा घेतला.
Dr. Mohan Bhagwat : स्वार्थावर चाललेले जग आनंद देऊ शकत नाही, सद्भावना हा भारताचा स्वभाव !
व्यासपीठावर एआयडब्ल्यूसीच्या माजी अध्यक्षा शीला काकडे, पूर्व विदर्भ महिला परिषद अध्यक्ष नीलिमा शुक्ला व सचिव नीला कर्णिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सरिता कौशिक यांनी केले, तर आभार अनसूया काळे-छाबरानी यांनी मानले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. लहानपणी या इमारतीत कित्येकदा आलो. नाटकाच्या प्रॅक्टिससाठीही येथे येत असे. काही वर्षांत इमारतीची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे नूतनीकरणाचा प्रस्ताव मिळताच त्याला तात्काळ मंजुरी दिली, असे ते म्हणाले. अनसूयाबाई काळे स्मृती सदन व नूतनीकरण केलेली वसतिगृह सुविधा यामुळे महिलांच्या प्रगतीस नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.








