व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : महायुतीत भगदाड, मविआही विस्कळीत!

Local Body Elections : महायुतीत भगदाड, मविआही विस्कळीत!

Triangular contests in Buldhana–Chikhli : बुलढाणा–चिखलीत तिरंगी लढतीने निवडणूक रंगणार

Buldhana जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक रणधुमाळीने तापल्या असून, महायुतीत उमेदवारीवरून मोठी फूट पडली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी अनेक ठिकाणी एकमेकांपासून स्वतंत्र उमेदवारी देत महायुतीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतही काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे गोंधळलेली दिसत आहेत.

मेहकर, मलकापूर, खामगाव, लोणार, शेगाव येथे ‘मविआ’चे एकसंघपण पूर्णपणे फिस्कटले. नांदुरा व देऊळगाव राजा येथे शहर विकास आघाडीनं उमेदवारी दाखल केली. काँग्रेस-वंचित आघाडी असली तरी काही शहरात वंचितने स्वतंत्र उमेदवारी देत राजकीय ‘खिचडी’ अधिकच घट्ट केली आहे.

१७ नोव्हेंबर हा नामनिर्देशनाचा अंतिम दिवस असल्याने जिल्ह्यात अर्जदारांचा अक्षरशः पोळा फुटला. नगराध्यक्षपदासाठी आज १३४ अर्ज, नगरसेवक पदासाठी १३१७ अर्ज दाखल झाले.

Local Body Elections : चिखलीत ३ तासांत राजकीय स्फोट, काँग्रेसमध्ये गोंधळ!

१० ते १७ नोव्हेंबरदरम्यान नगराध्यक्षपदासाठी २१२, नगरसेवकासाठी २५४१, असा एकूण २७५३ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले. १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. यानंतर खरी लढत कोणात होणार याचे गणित निश्चित होणार आहे.

बुलढाणा नगरपरिषदेत महायुतीच्या ‘एकजुटी’चा फुगा फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड, तर भाजप जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांनी समोरासमोर उमेदवारी दिल्याने भाजप-शिवसेनेतील संघर्ष चिघळला आहे. गायकवाड यांनी युतीवर टीका करताना, “भाजपकडून युतीची वाट पाहत होतो, पण प्रतीक्षा व्यर्थ ठरली,” असा टोला लगावला.

चिखलीतही महायुती कोसळली असून तिहेरी लढत रंगली आहे. काँग्रेसचे काशीनाथ बोंद्रे, भाजपचे पंडितराव देशमुख, तर काँग्रेसचे प्रा. नीलेश गावंडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी (अप) कडून उमेदवारी घेतली. महाविकास आघाडीतर्फे लक्ष्मी काकस, वंचितकडून डॉ. संगीता हिरोळे यांनीही अर्ज भरल्याने तिरंगीच नव्हे तर चौकोनी लढत होण्याची चिन्हे आहेत.

नगराध्यक्षपदासाठी:
शहर विकास आघाडीकडून – नेहा सुनगत
भाजप-राष्ट्रवादी (अप) – माधुरी शिपणे
शिवसेना (उबाठा)-काँग्रेस आघाडी – शोभा कासारे
वंचित – निर्मला खैरनार
रिपाई (आठवले) – शारदा भालेराव
अपक्ष – बेबी खरात

मलकापूर – भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (अप) सर्वच पक्षांकडून स्वतंत्र उमेदवारी

मेहकर – शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे), काँग्रेस, भाजप, वंचित, एमआयएम असा ६ पक्षांचा मेळ

खामगाव – मंत्री आकाश फुंडकर यांनी वहिनी अपर्णा फुंडकर यांना उमेदवारी दिली; काँग्रेस, वंचित, राष्ट्रवादी (अप) स्वतंत्र

शेगाव – भाजपचे अशिष सावळे, काँग्रेसचे प्रकाश शेगोकार, वंचितची प्रीती शेगोकार, राष्ट्रवादी (अप)चे पवन पचेरवाल मैदानात

लोणार – भाजप, शिवसेना (शिंदे), काँग्रेस, शिवसेना (उबाठा) अशा चारही पक्षांच्या उमेदवारांनी नामांकन भरले असून इथेही संघर्ष चुरशीचा राहणार आहे.

Mul Municipal Council Election मुलमध्ये भाजपाची लाट, आ.मुनगंटीवारांच्या नेतृत्वावर नागरिकांची खात्री !

तालुकानिहाय अर्जांची स्थिती

बुलढाणा – नगराध्यक्ष १३ (नगरसेवक २४६)
चिखली – नगराध्यक्ष २३ (२६९)
देऊळगाव राजा – नगराध्यक्ष २३ (१६८)
जळगाव जामोद – नगराध्यक्ष १४ (१६७)
खामगाव – नगराध्यक्ष १३ (२०२)
लोणार – नगराध्यक्ष २३ (२२७)
मलकापूर – नगराध्यक्ष २० (३५९)
मेहकर – नगराध्यक्ष २० (३२५)
नांदुरा – नगराध्यक्ष १५ (२०५)
शेगाव – नगराध्यक्ष ३६ (२६७)
सिंदखेड राजा – नगराध्यक्ष १२ (१०६)

नेत्यांचे कुटुंब राजकारणात
पूजा गायकवाड – शिवसेना (शिंदे), अर्पिता शिंदे – भाजप, अपर्णा फुंडकर – भाजप (मंत्री आकाश फुंडकर यांचे वहिनी) या तिघींच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यात कुटुंबीयांची राजकारणातील भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे.

नांदुऱ्यात नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवकपदासाठी ९९ अर्ज दाखल झाले. यामध्ये समाजवादी पार्टी, भाजप, आकोट विकास आघाडी, वंचित, अपक्ष अशा पाच गटांचे उमेदवार मैदानात उतरले आहेत.

error: Content is protected !!