व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : चिखलीत ३ तासांत राजकीय स्फोट, काँग्रेसमध्ये गोंधळ!

Local Body Elections : चिखलीत ३ तासांत राजकीय स्फोट, काँग्रेसमध्ये गोंधळ!

Rebellion by Congress’s Nilesh Gawande : निलेश गावंडे यांची बंडखोरी; तिसरी आघाडी उभारली

Chikhli चिखली नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये सोमवारी अवघ्या तीन तासांत नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे तिकीट कटताच काँग्रेसचे प्रमुख इच्छुक प्राचार्य निलेश गावंडे यांनी अचानक बंड करत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठिंब्याने तिसरी आघाडी उभारली.

२०१६ मधील नाट्यमय प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याचे चिखलीत चर्चा रंगल्या आहेत. तेव्हा काँग्रेसचे कुणाल बोंद्रे यांचे तिकीट कटल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती. यंदाही तिकीट कापल्यानंतर गावंडेंनी ‘तोच पॅटर्न’ पुनरुज्जीवित केला.

Local body election : स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मोठे पक्षांतर; भाजपची रणनीती चर्चेत !

 

काँग्रेसकडून बोंद्रे मैदानात; गावंडेंची बंडखोरी
काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी काशिनाथ आप्पा बोंद्रे यांची अधिकृत घोषणा केली. मात्र याच क्षणी घडामोडींना वेग आला. दोन वर्षांपासून तयारी करणारे प्राचार्य निलेश गावंडे यांचे तिकीट कटल्याचे स्पष्ट होताच त्यांनी ताबडतोब बाजू बदलत राष्ट्रवादी (अप)चा एबी फॉर्म घेतला.तसेच
शिवसेना (शिंदे)चा पाठिंबा मिळवला.
काँग्रेस व भाजपमधील नाराज नेत्यांना सोबत घेत
‘तिसरी आघाडी’ स्थापन केली आणि नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला.

भाजपमध्येही आतल्या गाठी; देशमुखांना अखेर तिकीट
भाजपमध्येही तिकीटासाठी पंडितदादा देशमुख आणि संध्याताई कोठारी यांच्यात जोरदार स्पर्धा होती. शेवटी देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी आमदार श्वेताताई महाले-पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली.

काँग्रेसमध्ये प्रवेश-निर्गमनाचा सिलसिला
काशीनाथ बोंद्रे यांचे तिकीट जाहीर होताच काँग्रेसमध्येही उलथापालथ सुरू झाली.
दिवंगत काँग्रेस नेते दीनदयाल वाधवाणी यांचे सुपुत्र अमित वाधवाणी यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत वॉर्ड ११ ची उमेदवारी पटकावली.
काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेले शहजाद भाई, तिकीट न मिळताच पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.
त्यांच्या कुटुंबातील भाईजान यांना काँग्रेसने तात्काळ उमेदवारी देत समीकरणे अजूनच गोंधळली.

Local Body Elections : १५ नगरपरिषद व १२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस !

चिखलीत तिरंगी लढत निश्चित
आता चिखलीत तीन मुख्य उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत:
काशिनाथ बोंद्रे – काँग्रेस
पंडितदादा देशमुख – भाजप
प्राचार्य निलेश गावंडे – तिसरी आघाडी (राष्ट्रवादी अप + शिवसेना शिंदे)

नगरसेवक पदासाठीही तिन्ही गटांच्या उमेदवारांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल केले.

शेवटच्या क्षणी बदललेले राजकीय फेरफार

गावंडेंचे तिकीट कटल्याची माहिती अर्ज भरण्याच्या अवघ्या तीन तास आधी मिळाली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी बैठकांचा पाऊस पडला आणि लगेचच तिसरी आघाडी अंतिम झाली. २०१६ सारखीच ‘नाट्यमय निवडणूक पूर्वसंध्या’ पुन्हा अनुभवायला मिळाल्याचे चिखलीत चर्चा सुरू आहेत.

उमेदवारांचा जनतेशी संवाद

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तिन्ही प्रमुख उमेदवारांनी माध्यमांशी संवाद साधताना “शहराच्या विकासासाठी प्रामाणिक काम करू” अशी भूमिका मांडली. आता छाननीनंतर खरी लढत कोणात रंगते, हे पाहण्यासाठी चिखलीकर उत्सुक आहेत.

error: Content is protected !!