व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Bjp mul : मुलमध्ये ‘कमळ’ आघाडीवर,मुनगंटीवारांच्या विकासकामांची जादू !

Bjp mul : मुलमध्ये ‘कमळ’ आघाडीवर,मुनगंटीवारांच्या विकासकामांची जादू !

Congress in turmoil, voters state of uncertainty Kamal’s victory in Mul almost certain : काँग्रेस गोंधळात, मतदार निर्धारात,मुलमध्ये कमळाचा विजय जवळपास निश्चित

Chandrapur : मुल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत झालेला व्यापक विकास हा प्रमुख मुद्दा ठरल्याने मुल शहरातील निवडणूक वातावरण भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. विकासकामांची प्रत्यक्ष उदाहरण आणि भविष्यातील विकासविषयक ठोस व्हिजन यांच्या आधारावर शहरातील सर्वसामान्य मतदारांचा कल भाजपकडे दृढतेने वळल्याचे संकेत प्रचार मोहिमेतून उघड झाले आहेत.

माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात मुल शहरात झालेले रस्त्यांची कामे, आधुनिक इको पार्क, स्टेडियम व जलतरण तलाव, आदिवासी वसतिगृह, पत्रकार भवन, व्यायामशाळा, कर्मवीर कन्नमवार सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, नवीन तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत, कृषी महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज मंजुरी, बसस्टँड, आठवडी बाजार, १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, ओव्हरब्रिज, नवीन पोलिस स्टेशन, योगाभवन, रहिवासी पट्टा वितरण उपक्रम अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांनी शहरातील मूलभूत सुविधा आणि नागरिककेंद्रित सेवा मजबूत झाल्या. या सर्व विकासकामांचा थेट परिणाम निवडणूक वातावरणावर दिसत आहे.

Sudhir Mungantiwar : उशिराने उमजले वास्तव , चंद्रपूरचे खासदार म्हणून मुनगंटीवारांचीच गरज होती!

नगरपरिषदेसाठी उत्पन्न खर्च तफावत ५ कोटी १७ लाख १४ हजार ४८५ रुपये इतकी वाढूनही नागरिकांवर कोणताही अतिरिक्त करभार न टाकता ती भरपाई शासनातून करून दिल्याचा उल्लेखही प्रचार सभांमध्ये नागरिकांनी सकारात्मकपणे घेतला. त्या पार्श्वभूमीवर शहरातील आर्थिक व्यवस्थापन, निधी मिळवून दिल्याची क्षमता आणि सार्वजनिक सेवेवरील कटिबद्धता यामुळे मतदारांचा विश्वास भाजप उमेदवारांकडे झुकत आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित प्रचार सभांना मिळालेला प्रतिसाद हा गर्दीचा किंवा उपस्थितीचा नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेल्या विकासावरील आणि भविष्यातील प्रगतीच्या व्हिजनवरील विश्वासाचा दाखला असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. “विकास म्हणजे घोषणा नाही, तर प्रत्यक्ष पूर्ण झालेले बदल” हा संदेश उमेदवारांकडून प्रभावीरीत्या पोहोचल्याचेही स्पष्ट होत आहे.

Sudhir Mungantiwar : ५३२ जीवनांना नवा प्रकाश: मुनगंटीवारांचा उपक्रम ठरला सेवाभावाचा दीप !

प्रचार सभेत मुनगंटीवार यांच्या हस्ते नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या ‘प्रगती वचननामा’चे अनावरण करण्यात आले. यात शहराच्या सर्वांगीण विकास, दैनंदिन प्रशासकीय सोयीसुविधा, महिला – युवा- क्रीडा- सांस्कृतिक पायाभूत सुविधा आणि उद्योगक्षम रोजगार संधी या क्षेत्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रा. किरण कापगते या उमेदवार असून त्यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसादही विकासाच्या मुद्द्याशी थेट जोडलेला असल्याचे निरीक्षण व्यक्त होत आहे.

Sudhir Mungantiwar : लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीसाठी ३० दिवसाची मुदतवाढ द्या

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांच्यासह २३ काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे समाजघटकांच्या विस्तृत पाठिंब्यासोबतच संघटनात्मक पातळीवरही भाजप अधिक बळकट झाली आहे. परिणामी, काँग्रेसचे संघटन कमकुवत होत असल्याचे आणि पक्ष नेतृत्वाचा स्पष्ट अभाव जाणवत असल्याचे चित्र राजकीय पटलावर निर्माण झाले आहे.

मूल शहराने निवडणूक फक्त राजकीय स्पर्धा म्हणून नव्हे तर “भविष्यातील विकास आणि स्थिर सुशासन” या निकषावर केंद्रित केल्याचे वातावरण पाहता, आगामी निवडणुकीत विकास मुद्दा निर्णायक ठरणार असल्याची राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे.

____

error: Content is protected !!