municipal council recovered ₹60 lakh : उमेदवारांसह सूचक–अनुमोदकांकडूनही कर भरण्याची धडाधड
Buldhana नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसाठी धावपळ सुरू झाली असून थकीत मालमत्ता कर भरण्याचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी, बुलढाणा नगरपालिकेत तब्बल ६० लाखांची, तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव नगरपालिकेत तब्बल ५५ लाखांची करवसुली झाली आहे. आर्थिक वर्षाच्या मध्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर अचानक झालेली करवसुली प्रशासनासाठी ‘अतिरिक्त बोनस’ ठरली आहे.
निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारासोबतच त्यांचा सूचक आणि अनुमोदक यांच्यावरही कोणतीही थकबाकी नसणे बंधनकारक आहे. थकबाकी असल्यास कागदपत्रे मिळत नाहीत. अर्जासोबतच कर भरण्याची पावती जोडणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये मालमत्ता, कर्ज-विवरण, शैक्षणिक कागदपत्रे तसेच घरात शौचालय असणे अनिवार्य आहे. या कारणांमुळे, अर्ज दाखल करण्याआधी अनेकांनी थकबाकी भरून काढत पालिकेच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
Local Body Elections : प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, मैदान मारण्यासाठी आटापीटा
उमेदवार आणि त्यांच्या सूचक–अनुमोदकांनी तातडीने कर भरल्याने पालिकांना महसूल मिळाला असला तरी, “निवडणुकीच्या तोंडी नव्हे तर वर्षभर नियमित कर भरा,” असा सूर काही नागरिक आणि राजकीय मंडळींकडून निघत आहे. नियमित कर न भरता केवळ निवडणुकीच्या गरजेसाठीच कर भरण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचीही चर्चा आहे.
थकीत कर भरणे बंधनकारक – अन्यथा अर्जच अडतो
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने—
थकीत मालमत्ता कर भरलेला असावा
कराची अधिकृत पावती अर्जासोबत जमा करावी
सूचक आणि अनुमोदकांचीही थकबाकी नसावी
यामुळे अनेकांनी तातडीने कर भरत पालिकेची थकीत महसूल वसुली झपाट्याने पूर्ण केली.
Local Body Elections : अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये ‘त्या’ वर्षाची मतदार यादीच नाही
आकड्यांत वसुलीची झेप
बुलढाणा नगरपालिका : ₹६० लाख
खामगाव नगरपालिका : ₹५५ लाख
इतर नगरपालिका : कर वसुलीत वाढ, आकडे वाढण्याची शक्यता
निवडणूक प्रक्रियेमुळे अचानक झालेली महसुलातली ही भरभराट पालिकांसाठी महत्त्वाची ठरत आहे.








