Sudhir Mungantiwar : विदर्भ-मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे पुनर्गठन करा

MLA Sudhir Mungantiwar firm demand in the winter session : आ.सुधीर मुनगंटीवार यांची हिवाळी अधिवेशनात ठाम मागणी

Nagpur : हिवाळी अधिवेशनात हरकतीच्या मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत ठाम, आंकडेवारीनिशी आणि संविधानिक अधारासह विदर्भ-मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे पुनर्गठन करण्याची मागणी जोरदारपणे मांडली. अधिवेशन विदर्भात भरविण्याचे मूलभूत उद्दिष्ट म्हणजे या प्रदेशाच्या जनतेला न्याय मिळवून देणे हे असल्याचे त्यांनी नमूद करत, विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले.

आ.मुनगंटीवार म्हणाले की, गेली पाच वर्षे वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसल्याने निधी विभाजनाच्या आकडेवारीत स्पष्ट असमतोल दिसून येतो आहे. मुख्य अर्थसंकल्पात विभागनिहाय आकडे देण्यात आले तरी पुरवणी मागण्यांमध्ये त्याचे प्रतिबिंब नाही, हा गंभीर प्रश्‍न त्यांनी सभागृहात मांडला. दांडेकर समिती, केळकर यांच्या सत्यशोधन समित्यांच्या अहवालांनुसार विदर्भ- मराठवाड्यात अजूनही अनुशेष कायम असल्याचे दाखले त्यांनी सभागृहासमोर ठेवले.

winter session : जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

ते पुढे म्हणाले की, 26 जुलै 1984 राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने पारित केला होता. 2020 पासून विविध मंत्री, आमदार, जनप्रतिनिधी अशा शंभराहून अधिक मागण्यांनंतरही प्रस्ताव केंद्राकडे न पाठवणे म्हणजे 371(खंड 2) चा अवमान आहे. त्यामुळे सर्व संमतीने हा प्रस्ताव तात्काळ केंद्राकडे पाठवावा अशी आग्रही मागणी यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केली.

विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास हा कोणत्याही पक्षाच्या राजकारणाचा विषय नाही; तो न्यायाचा आणि घटनादत्त हक्काचा प्रश्न आहे.” सरकारने याबाबत स्पष्ट, ठाम आणि जबाबदार भूमिका घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Winter session : लाडक्या बहिणींना अडवणारे तुम्हीच! योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोण गेले होते?

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याची हमी देत, आ.मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांना
सर्वसहमतीने निश्चितच न्याय दिला जाईल असे आश्वस्त केले.