Local Body Elections : तिकिट हवी तर भाजपचीच, इच्छुकांची गर्दी वाढली

BJP receives 806 applications for candidature : भाजपाकडे ८०६, काँग्रेसकडे १५८ आणि उबाठाकडे १३७ इच्छुकांचे अर्ज; महाविकास आघाडीतही चर्चांना वेग

Akola महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ते २२ डिसेंबरदरम्यान लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, अकोल्यातील राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. विविध पक्षांकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू असून, सर्वाधिक प्रतिसाद भाजपाकडे पाहायला मिळाला.

भारतीय जनता पक्षाकडे तब्बल ८०६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे भाजपात तिकीटासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसकडे १५८ तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे १३७ इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १७ इच्छुक उमेदवार एकाच दिवशी पक्ष कार्यालयात हजर झाले.

Amol Mitkari : सीएसआर निधीतील रस्तेकामातील गैरव्यवहाराची चौकशी होणार

महापालिका निवडणुकीच्या तयारीनिमित्त शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्राथमिक चर्चा नुकतीच पार पडली.
जागावाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी १० ते १२ दिवसांत प्रमुख नेत्यांची बैठक होऊन एकमताने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आघाडीतील सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), वंचित आदी राजकीय पक्षांनी नियोजनाच्या बैठका सुरु केल्या आहेत.

शिवसेना (शिंदे) गटानेही इच्छुकांकडून अर्ज मागवण्याची घोषणा केली आहे. १० ते १५ डिसेंबर दरम्यान जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुख यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

MLA Sajid Khan Pathan : राजराजेश्वर मंदिर, विमानतळ, उर्दू घराचे काय झाले?

पक्षनिहाय अर्ज (नोंदलेले इच्छुक)

पक्ष इच्छुकांची संख्या

भारतीय जनता पक्ष ८०६
काँग्रेस १५८
शिवसेना (उबाठा) १३७
मनसे  १७