What happened to the Rajarajeshwar Temple, the airport, and the Urdu House? : आमदार साजिद खान पठाण यांचा सवाल, गटार योजना, दानाबाजारवर विचारला जाब
Akola हिवाळी अधिवेशनात अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी बुधवारी अकोल्यातील प्रलंबित विकासकामांबाबत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. मागील अधिवेशनांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही कामांची गती न वाढल्याबद्दल त्यांनी सरकारकडून कठोर उत्तरांची मागणी केली.
आमदार पठाण यांनी श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासंदर्भात मंजूर ‘ब वर्ग’ दर्जा आणि ५० कोटी रुपयांच्या निधीची आठवण करून देत, “निधी मंजूर झाला… पण प्रत्यक्षात एक रुपयाही मिळालेला नाही,” असा टोकदार सवाल उपस्थित केला.
अकोला विमानतळाच्या उन्नतीसाठी मंजूर करण्यात आलेला २०९ कोटी रुपयांचा निधी अद्याप मिळालेला नसल्यावरही त्यांनी सरकारला जाब विचारला. शहरातील उर्दू घर प्रकल्पाला मंजुरी मिळूनही निधी न मिळाल्याचे त्यांनी पुनश्च सभागृहाच्या निदर्शनास आणले.
winter session : जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!
जनता भाजी बाजारातील ७२६ दुकानांना मनपाने बजावलेल्या नोटिसांवरून आणि तीन वर्षांपूर्वी दानाबाजारातील दुकाने पाडून हजारो लोकांचा रोजगार हिरावून घेतल्याबद्दलही त्यांनी सरकारची कोंडी केली. “लोकांचा रोजगार हिरावून घेणाऱ्या कारवाईनंतर सरकारचे धोरण काय? कायमस्वरूपी पुनर्वसनाची तरतूद कुठे आहे?” असा त्यांचा थेट सवाल होता.
अकोल्याच्या ७३५ कोटी रुपयांच्या गटार योजनेचा निधी थांबवल्याने कामे रखडल्याचा मुद्दा त्यांनी मांडत संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. याशिवाय दानाबाजारातील दुकानदारांवर मनपाने लादलेल्या जादा करविषयीही त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
Sudhir Mungantiwar : विदर्भ-मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे पुनर्गठन करा
अकोल्यातील मंदिर विकास, विमानतळ उन्नती, गटार योजना, व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि रोजगाराचा मुद्दा, या सर्व विषयांवर आमदार पठाण यांनी जोरदार भूमिका घेत सरकारला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.








