Mahayuti Government : युती सरकारच्या शाळाबंदी धोरणाचा थेट फटका मुलींना

The coalition government’s school-closure policy directly affects girls : १५ हजारांहून अधिक मुली शिक्षणाबाहेर, शिवसेनेचा दावा

Buldhana कमी पटसंख्या हा केवळ बहाना करून युती सरकारने हजारो शाळा बंद केल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा)ने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील मुलींच्या शिक्षणावर या निर्णयाचा मोठा परिणाम झाल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. १५,३५७ किशोरवयीन मुली शिक्षणापासून दूर गेल्या आहेत. तरीही सरकारने न आत्मपरीक्षण केले, न जबाबदारी स्वीकारली, अशी टीका शिवसेना नेत्या जयश्री शेळके यांनी केली आहे.

शेळके म्हणाल्या, “खर्चाची वजाबाकी करणे सरकारला जमेल; पण जे मुलींचे अमूल्य शिक्षण हिरावून घेतले, त्याची संधी परत देऊ शकण्याची क्षमता सरकारकडे आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

Amol Mitkari : सीएसआर निधीतील रस्तेकामातील गैरव्यवहाराची चौकशी होणार

राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांना एकत्रीकरणाच्या नावाखाली बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याचा सर्वाधिक परिणाम गावोगावी असलेल्या मुलींच्या शिक्षणावर झाल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्राच्या महिला व बालकल्याण विभागाने जाहीर केलेल्या (२०२५-२६) आकडेवारीनुसार —
• १५,३५७ मुली शाळाबाहेर
• ३०,७१४ एकूण शाळाबाह्य मुले-मुली
• किती विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत दाखल केले याची राज्यात कोणतीही नोंद उपलब्ध नाही

शाळा बंद झाल्यामुळे अनेक गावांमध्ये घराजवळ शाळांचे पर्यायच उरले नाहीत. शासन प्रवास भत्ता देत असले तरी, मुलींना दूरच्या शाळेत पाठवणे अनेक पालकांना सुरक्षित वाटत नाही छेडछाड किंवा अत्याचाराच्या घटनांची भीती माध्यमिक वर्ग जवळ नसणे बालविवाहाची अद्यापही अस्तित्वात असलेली कुप्रथा, या कारणांमुळे मुली शाळेबाहेर पडत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षकांनी नमूद केले.

MLA Sajid Khan Pathan : राजराजेश्वर मंदिर, विमानतळ, उर्दू घराचे काय झाले?

शेळके यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, शाळा बंद करून खर्च वाचविण्याचा प्रयत्न हा मुलींचे भविष्य धोक्यात घालणारा निर्णय आहे. “शाळा बंद केल्या, पण पर्यायी सुरक्षित शिक्षणव्यवस्था कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.