Municipal Corporation Elections : पालिका निवडणुकीआधीच भाजपने खाते उघडले; या उमेदवारांची बिनविरोध निवड

Two BJP nominees declared elected unopposed before elections : विरोधकांनी उमेदवारच दिला नाही; मुंबई व कल्याण-डोंबिवलीत विजय

Mumbai मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत काही प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाल्याची महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार उभा करता आला नाही आणि त्यामुळे भाजपच्या तसेच महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला.

मुंबई महापालिकेच्या वार्ड क्रमांक १५ मध्ये भाजपच्या जिग्ना शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. या वॉर्डात विरोधकांकडून इच्छुक उमेदवार होते, मात्र अखेर अधिकृत उमेदवारी दाखल झाली नाही. त्यामुळे जिग्ना शाह यांचा विजय निश्चित झाला. जिग्ना शाह या स्थानिक पातळीवर सक्रिय असून त्यांनी महिला सुरक्षेचे प्रश्न, स्वच्छता मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

municipal elections : ‘भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर, राजकारणाची हास्यजत्रा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतही अशाच प्रकारे दोन प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक १८-अ मधून रेखाताई चौधरी या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. या मतदारसंघात विरोधकांना उमेदवार मिळाला नाही. तसेच प्रभाग क्रमांक २६-क मधून आसावरीताई केदार नवरे या नगरसेविका पदी बिनविरोध विजयी झाल्या आहेत. या वॉर्डातही विरोधकांना उमेदवार मिळाला नाही. आसावरीताई नवरे या स्थानिक पातळीवर लोकप्रिय असून त्यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम केले आहे.

या तिन्ही प्रभागांमध्ये विरोधकांना उमेदवार उभा करता आला नाही ही बाब विशेष लक्षवेधी आहे. सामान्यतः महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्डात अनेक उमेदवार उभे राहतात. मात्र या वेळी विरोधकांनी उमेदवारी दाखल केली नाही. यामागे स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कमकुवतपणा, अंतर्गत मतभेद आणि उमेदवारांची कमतरता हे कारण असू शकते.

Pmc election: सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर भाजपाच्या उमेदवार पूजा मोरे यांची माघार

जिग्ना शाह, रेखाताई चौधरी आणि आसावरीताई नवरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप आणि महायुतीला स्थानिक पातळीवर बळ मिळाले आहे. या विजयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीआधीच खाते उघडल्याने हा शुभसंकेत मानता जात आहे.