व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Thane municipal corporation elections : काँग्रेसला मोठा धक्का, १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Thane municipal corporation elections : काँग्रेसला मोठा धक्का, १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

12 congress corporators to join BJP in Thane : राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप, काही काळापासून होते नाराज

Thane ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसचे तब्बल १२ नगरसेवक एकाचवेळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसचे नगरसेवक गेल्या काही काळापासून नाराज होते. स्थानिक पातळीवर नेतृत्वाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांच्यात होती. तसेच विकासकामांमध्ये अपेक्षित गती नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशामुळे अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Municipal elections: राजकारण तापले, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला!

मात्र भाजपच्या या खेळीमुळे शिवसेना शिंदे गट नाराज होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगरपरिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या या नगरसेवकांच्या बळावर भाजपा अंबरनाथ परिषदेत बहुमतात येणार आहे. तर यावर शिवसेनेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

मात्र काँग्रेसकडून १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षासोबत शिस्तभंग केल्याचा ठपका या नगरसेवकांवर ठेवण्यात आलाय. पण दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळांवरच गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्याकडून ब्लॉक अध्यक्ष पदासाठी एक कोटीची केली मागणी केली. असा गंभीर आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांनी काँग्रेसवरही नाराजीचा सूर लावला, “निवडणुकीमध्ये एकदाही काँग्रेस आम्हाला विचारलं नाही. आम्ही आमच्या जोरावर निवडून आलो.”

Municipal elections : मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव

या प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसचे नगरसेवकांची संख्या घटल्यामुळे पक्षाची सत्ता टिकवणे कठीण होईल. दुसरीकडे भाजपची ताकद वाढणार असून आगामी निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होईल. पण मित्रपक्ष शिवसेनेला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याने शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे.

error: Content is protected !!