Buldhana ZP Election 2026 : बुलढाणा जिल्हा परिषदेवर भाजपचा ‘स्वबळाचा’ डोळा; मविआमध्ये पुन्हा ऐक्याचे वारे!

BJP may fight the elections independently : महापालिकेनंतर आता ‘जिल्हा परिषद’ टार्गेट; भाजप-शिंदेसेनेतील धुसफूस वाढली

Buldhana राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून ‘नंबर वन’चा पक्ष ठरल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास आता शिखरावर पोहोचला आहे. या यशाची लाट ग्रामीण भागात नेण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, आगामी बुलढाणा जिल्हा परिषद निवडणुकीत (Buldhana ZP Election 2026) स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. माजी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असली, तरी यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

बुलढाणा जिल्हा परिषद हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके येथे काँग्रेसची सत्ता राहिली आहे. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपने आता हा गड सर करण्याचे ठरवले आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी, “भाऊसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणारच,” असा शब्द दिला आहे. भाजप सध्या जिल्ह्यातील सर्वात सक्रिय संघटना म्हणून समोर येत असून, नगरपालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वबळावर लढण्याची मानसिकता पक्षाने तयार केली आहे.

Land Rates Surge: वैनगंगा–पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे वारे; हवाई सर्वेक्षणानंतर शेतीचे भाव गगनाला, पण खरेदी-विक्री ठप्प!

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषदेत महायुतीचाच झेंडा फडकेल असा दावा केला असला, तरी ग्राऊंड झिरोवर चित्र वेगळे आहे. बुलढाणा नगरपालिकेत भाजपला शिंदेसेनेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय वैर टोकाला पोहोचले आहे. भाजप केवळ विरोधकांनाच नाही, तर मित्रपक्षांनाही त्यांची जागा दाखवून देण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते, जसे त्यांनी संभाजीनगर, पुणे आणि मुंबईत करून दाखवले आहे.

मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये स्वतंत्र लढल्यामुळे महाविकास आघाडीला (MVA) मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) स्वतंत्र लढल्याने भाजपचा विजय सुकर झाला. हाच धडा घेऊन बुलढाणा जिल्हा परिषदेत मविआ पुन्हा एकदा ‘एकत्र’ येण्याची दाट शक्यता आहे. जर हे तीनही पक्ष एकत्र आले, तर भाजपच्या स्वबळाच्या नाराल मोठी खीळ बसू शकते.

Akola Municipal Corporation Election : भाजपाने नाकारलेलेच ठरले ‘किंगमेकर’!

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि शहरी पट्ट्यात MIM ची मोठी ताकद आहे. सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर हे पक्ष निर्णायक ठरू शकतात. त्यांची थेट सत्ता जरी आली नाही, तरी ते मोठ्या पक्षांचे विजयाचे गणित बिघडू शकतात. विशेषतः मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन झाल्यास त्याचा थेट फायदा भाजपला मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.