Sudhir Mungantiwar : भुरसे कुटुंब गहिवरले, म्हणाले सुधीरभाऊ आपल्या सहकार्याबद्दल आमच्याकडे शब्द नाही..

MLA Sudhir Mungantiwar becomes an angel for a cancer stricken family : कॅन्सरग्रस्त कुटुंबासाठी देवदूत ठरले आमदार सुधीर मुनगंटीवार

Chandrapur : पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील मुकुंद सुरेश भुरसे यांना तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती समजताच भुरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जीवघेणा आजार, उपचारांचा प्रचंड खर्च आणि उद्याच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण कुटुंब हतबल झाले होते. घरात निराशेचे वातावरण पसरले असताना या संकटाच्या क्षणी आमदार सुधीर मुनगंटीवार हे देवदूतासारखे मदतीसाठी धावून आले आणि भुरसे कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश घेऊन आले.

कोणताही विलंब न करता राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील नामांकित हिंदुजा रुग्णालयात मुकुंद भुरसे यांच्या शस्त्रक्रियेची संपूर्ण व्यवस्था करून दिली. उपचारांसोबतच रुग्ण व नातेवाइकांच्या राहण्याची आणि जेवणाचीही काळजी त्यांनी घेतली. धर्मदाय योजनेच्या माध्यमातून सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांचा शस्त्रक्रियेचा खर्च पूर्णतः मोफत करून देण्यात आला.या मदतीमुळे उपचारांचा भार हलका होऊन भुरसे कुटुंबाच्या मनावर दाटून आलेली भीती आणि चिंता क्षणात दूर झाली.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिला शब्द अवघ्या दोन महिन्याच्या आत केला पूर्ण ; चिंतलधाबा १००% सौरग्रामकडे

मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि गंभीर आरोग्य संकटातून मुकुंद भुरसे सुखरूप बाहेर पडले. उपचार यशस्वी झाल्यानंतर केवळ आजारावरच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबावर कोसळलेल्या मानसिक तणावावरही मात झाली. “तुम्ही एकटे नाही” असा दिलासा देणारा मायेचा हात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या कुटुंबाच्या खांद्यावर ठेवला आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण समाजासमोर उभे केले.

इतक्यावरच न थांबता पुढील उपचारांचा मार्गही सुलभ व्हावा यासाठी रेडिएशन थेरपीसाठी अतिरिक्त ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला. त्यामुळे उर्वरित उपचारांसाठी भुरसे कुटुंबाला कोणतीही अडचण भासणार नाही, याची खात्री मिळाली आहे. संकटात संवेदनशीलतेने पुढाकार घेत, एका सामान्य कुटुंबाच्या वेदना स्वतःच्या समजून मदतीचा हात पुढे करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा जनतेच्या दुःखात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी म्हणून समोर आले आहेत.

Maharashtra politics : निर्णय राष्ट्रवादीचा, पण आधी आमच्याशी चर्चा आवश्यक

डोळ्यांत अश्रू आणि मनात अपार कृतज्ञता ठेवत भुरसे कुटुंबाने या अमूल्य सहकार्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार व्यक्त केले. एका कुटुंबाला नवजीवन देणारी ही मदत केवळ आर्थिक नव्हे, तर माणुसकी, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे.