
power-cut-at-khasdar-industrial-festival-advantage-vidarbha : “खात्याची ऊर्जा गेली तरी आमची कायम” म्हणत वेळ मारून नेली
Nagpur राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस ‘खासदार औद्योगिक महोत्सवात’ विदर्भातील औद्योगिक क्रांतीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकत असतानाच अंधार झाला. त्यामुळे आयोजकांचा एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्री भाषण करत असतानाच व्यासपीठावरील दिवे मालवले. विशेष म्हणजे, महावितरण किंवा ऊर्जा खात्याचा या वीज जाण्याशी सुतराम संबंध नव्हता, तर हा गोंधळ केवळ आयोजकांच्या नियोजनातील त्रुटीमुळे झाला होता. हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगून टाकले, हे विशेष.
ऊर्जामंत्री समोर उभे असतानाच वीज जाणे, हे विरोधकांसाठी ‘आयते कोलीत’ ठरले असते, हे ओळखून मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या नेहमीच्या शैलीत टोलेबाजी सुरू केली. “माझ्या ऊर्जा खात्याची ऊर्जा गेली असली, तरी आमची ऊर्जा कायम आहे,” असा टोमणा त्यांनी स्वतःच स्वतःच्या स्थितीवर मारला. ज्या वेगाने सरकार उद्योगांना मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री सांगत होते, त्या ‘विद्युत वेगा’लाच ब्रेक लागल्याचे पाहून सभागृहात हशा पिकला.
Davos Summit 2026 : विदर्भाचा कायापालट! दावोसमध्ये ५.९२ लाख कोटींची ऐतिहासिक ‘लॉटरी’
चीनपेक्षा स्वस्त स्टील पुरवण्याचे आणि विदर्भात एक लाख रोजगार देण्याचे भव्य स्वप्न मांडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातच काळोख पसरल्याने, उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू होती. “विद्युत वेगाने सहकार्य करू” असे आश्वासन देताना झालेला हा ‘अंधार’ म्हणजे नेमकी काय चिन्हे आहेत? अशी खोचक विचारणा आता सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
Devendra Fadnavis : ‘आता तरी गप्प बसा!’; फडणवीसांनी थेट सुनावले
अमरावतीच्या विमानतळापासून गडचिरोलीच्या स्टील हबपर्यंतच्या सर्व घोषणांवर आयोजकांच्या एका चुकीच्या ‘स्विच’ने पाणी फिरवले. मुख्यमंत्र्यांनी जरी हा प्रसंग हसण्यावारी नेला असला, तरी भर सभेत ऊर्जामंत्र्यांनाच ‘शॉक’ देणाऱ्या या घटनेमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.








