manoj-jarange-patil-allegation-supri-threat-maratha-reservation : मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप, पुन्हा मैदानात उतरणार
Pandharpur : मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडून राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत गंभीर आरोप केले आहेत. पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला. “मला मारायला उठले आहेत, माझ्या हत्येसाठी सुपाऱ्या दिल्या जात आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला. मात्र “जोपर्यंत मायबाप जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कोणाची भीती नाही,” असे सांगत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मोठी घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. पंढरपूर दौऱ्यात त्यांनी सरकारवर तसेच काही विरोधकांवर निशाणा साधला. “सरकारच्या तळी उचलणारे म्हणतात आता माझ्यासोबत कोणी नाही. पण एका गावात येऊन पाहा, समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले, चांगल्या सरकारी नोकऱ्या मिळवल्या. मी त्यांच्या हक्कासाठी लढलो, मग समाज माझ्या पाठीशी उभा राहणार नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Mahayuti Government : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’; राज्य सरकारचे मोठे पाऊल
आपल्यावर वैयक्तिक टीका होत असल्याचाही उल्लेख करत त्यांनी काही जण समाजाच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. “मी जवळच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही म्हणून माझ्यावर आरोप होतात. समाजाच्या जीवावर दुकानदारी करणाऱ्यांना मोठे करायचे नाही. मला गोरगरीबांच्या लेकरांना मोठे करायचे आहे,” असे ते म्हणाले. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Panvel Municipal Corporation : पनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नितीन पाटील
जरांगे पाटील यांनी आगामी काळात पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवण्याचे संकेतही दिले. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ प्रत्यक्षात मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारकडून किंवा संबंधित यंत्रणांकडून त्यांच्या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.








