Mungantiwar-questions-Kishor-Jorgewar’s-authority-to-change-the-state-chief’s-list : आमदार मुनगंटीवार यांचा पलटवार, १७ निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हा प्रदेशाध्यक्षांचा सर्वोच्च अपमान
Chandrapur : प्रदेशाध्यक्षांनी दिलेली उमेदवारांची अधिकृत यादी बदलण्याचा अधिकार आमदार जोरगेवार यांना कोणी दिला?, असा रोखठोक सवाल करत माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार यांच्यावर पलटवार केला आहे. त्याचवेळी १७ निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हा प्रदेशाध्यक्षांचा सर्वोच्च अपमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुनगंटीवारांनी जोरगेवारांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचवेळी प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई निश्चित आहे, असे स्पष्ट संकेत आ. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. १७ निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा सर्वोच्च अपमान असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. याच कारणावरून जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी करण्यात आल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिला चंद्रपूरच्या विकासाचा ‘फाइव्ह इयर प्लॅन’!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करूनच संगीता खांडेकर यांचे नाव निश्चित झाले होते. जोरगेवार यांची गटनेतेपदाची मागणीही मान्य केली होती, तरीही त्यांनी महापौरपदासाठी पर्यायी उमेदवार का उभा केला? खांडेकरांच्या अर्जात त्रुटी असल्याचे सांगून संभ्रम निर्माण करण्यामागे नेमका हेतू काय? त्यांच्या मनात पाप होता का? असे रोखठोक सवालही मुनगंटीवारांनी उपस्थित केले.
मुनगंटीवार शहरात उपस्थित नव्हते, असा मुद्दा जोरगेवार यांनी पुढे केला होता. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘मी शहरात नसलो तरी माझे अनुभवी सहकारी सक्षम होते. माझी प्रत्यक्ष अनुपस्थिती हा मुद्दाच होऊ शकत नाही. पण, पक्षादेश डावलून समांतर उमेदवार उभा करणे हा संशयास्पद प्रकार आहे. शिस्तभंग करणाऱ्यांवर आज ना उद्या कारवाई होणारच आहे.थोडे थांबा, माझ्यावर काय कारवाई झाली याचे उत्तर तुम्हाला थोड्याच दिवसांत देतो, असा पलटवार त्यांनी केला.








