national-security/anil-bonde-on-bangladeshi-infiltrators-and-drug-mafia-connection-nagpur : अमरावती, नागपुरात अमली पदार्थांच्या साठ्यासह माफियांची धरपकड; मुंबई महापौरांच्या निर्णयाचे बोंडेंकडून स्वागत
Nagpur देशात दररोज मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ (ड्रग्स) जप्त केले जात आहेत. आता हे ड्रग्स अमरावतीसारख्या छोट्या शहरांमध्येही सहजपणे पोहोचत असून भारतीय तरुणांना नशेत बुडवण्याचा कट रचला जात आहे. ड्रग माफिया आणि बांगलादेशी घुसखोरांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.
“अमली पदार्थांचा हा प्रसार म्हणजे समाजाला लागलेला कर्करोग असून तो सहजासहजी नष्ट होणार नाही. यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’सारखेच एक मोठे ऑपरेशन करण्याची गरज आहे,” असे बोंडे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने सांगत आहेत की, घुसखोर ही देशाला लागलेली कीड आहे. त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र पश्चिम बंगालमार्गे हे घुसखोर भारतात सहज प्रवेश करतात आणि विविध राज्यांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करतात. त्यांना स्थानिक स्तरावर मिळणारा आसरा आणि संरक्षणामुळे ड्रग माफियांची एक मोठी साखळी तयार झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Congress Vidarbha : महापालिका, नगरपालिकेत मोठा पराभव; आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलणार?
हे बांगलादेशी माफिया मोठ्या शहरांतील झोपडपट्ट्यांमध्ये स्थायिक झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे झोपडपट्टीधारकांना मिळणारे पाणी, मोफत धान्य आणि इतर सोयीसुविधांचा फायदा हे घुसखोर घेत आहेत. “भारताचेच अन्न खाऊन देशाला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोप बोंडे यांनी केला. अमरावती शहरात नऊ महिन्यांपूर्वी काही घुसखोरांना पकडण्यात आले होते. तपासात अनेक घुसखोरांची नावे मतदार यादीत आल्याचे आणि काहींनी जन्माचे दाखलेही मिळवल्याचे उघडकीस आले आहे. यावरून त्यांची यंत्रणा किती खोलवर पसरली आहे, हे स्पष्ट होते.
Shivbhojan Thali : शिवभोजन थाळी चालक दहा महिन्यांपासून ‘उपाशी’; अनुदानाविना केंद्र चालवणे कठीण
सध्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याचे काम सुरू असून अनेकांचे जन्माचे दाखले रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळेच दोन दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला; तसेच नागपूर व वर्धा येथेही माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी घुसखोरांवर कारवाई करण्याचे जे आदेश दिले आहेत, त्याचे बोंडे यांनी स्वागत केले. भाजपच्या सर्वच महापौरांनी अशाच पद्धतीने मोहिमा राबवून घुसखोरांना हुडकून काढावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.








