bjp-shinde-sena-criticism-on-harshvardhan-sapkal-tipu-sultan-comparison : छत्रपती शिवरायांची तुलना ऐतिहासिक विकृतीकरण; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा चहूबाजूंनी निषेध
Buldhana काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, सपकाळ यांची ही भूमिका म्हणजे ‘हैदराबादी निजाम’ मानसिकतेची वैचारिक अवलाद असल्याची जहरी टीका सत्ताधारी गटाकडून करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय, दूरदर्शी आणि १८ पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे लोककल्याणकारी राजे होते. स्वराज्य, स्वाभिमान आणि परकीय जुलमी सत्तेतून जनतेची मुक्तता ही शिवरायांची खरी ओळख आहे. अशा महान राजाची तुलना आक्रमण करणाऱ्या इतर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीशी करणे, हे केवळ इतिहासाचे विकृतीकरण नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
Khamgao District demand : ‘खामगाव जिल्हा’ चर्चांना पुन्हा वेग; प्रशासकीय हालचालींमुळे आशा पल्लवित
सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शिवप्रेमी आणि सामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. “भारतभूमीवर आक्रमण करणाऱ्या शक्तींना पराभूत करून स्वराज्याचा भगवा ध्वज उंचावणारे शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना करण्याचा अधिकार कोणालाही नाही,” अशा शब्दांत त्यांच्या भूमिकेचा धिक्कार केला जात आहे. अनावश्यक वाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही विरोधकांकडून होत आहे.
सार्वजनिक जीवनात वावरताना आणि इतिहासातील महापुरुषांबद्दल बोलताना राजकीय नेत्यांनी जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या नावाचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याच्या नादात इतिहासाचा चुकीचा संदर्भ देणे हे समाजासाठी घातक ठरत असल्याचा सूर उमटत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्ष आपली काय अधिकृत भूमिका मांडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








