Nagpur Crime: खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला

nagpur-bjp-corporator-husband-nitin-shimle-armed-attack-kotwali-police : कार्यकर्त्यासह नितीन शिमले गंभीर जखमी, आरोपी फरार

 

Nagpur: नागपूरमध्ये रविवारी रात्री घडलेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत नितीन शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, नितीन शिमले आणि सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून जुना वाद होता. त्याच वादातून रविवारी रात्री चौकात त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली आणि त्यानंतर आरोपीने चाकूने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले.

Prashant Dikkar : प्रशांत डिक्करांचा ‘तेल्हाऱ्या’कडे मोर्चा; बुलढाणा सोडून अकोल्यात नशीब अजमावणार?

घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला. हल्ल्यानंतर आरोपी सोनू ठाकरे घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.

दरम्यान, काही सूत्रांच्या माहितीनुसार नितीन शिमले आणि महेश ठाकरे यांच्यात जुना वाद होता. जुन्या हत्येच्या प्रकरणात दोघेही आरोपी असल्याची चर्चा असून त्यातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास सुरू असून नेमके कारण आणि हल्ल्यामागील हेतू स्पष्ट करण्यासाठी चौकशी सुरू आहे.

Harshwardhan Sapkal : निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’; अनेक जिल्हाध्यक्षांची गच्छंती अटळ

या घटनेमुळे नागपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

___