व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मनात होते तेच बोलल्या!

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मनात होते तेच बोलल्या!

 

Munde was expecting Beed as a Guardian Minister : म्हणाल्या, ‘बीडचे पालकमंत्रीपद आनंददायी ठरले असते’

Nagpur राज्यात पालकमंत्रीपदांची नावे जाहीर झाली असली तरी महायुतीत यावरून अंतर्गत खदखद आहे. दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला दोनच दिवसांत स्थगिती देण्याची नामुष्कीसुद्धा सरकारवर ओढावली आहे. यावरून विरोधकांनीदेखील महायुतीला टार्गेट केले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनातील गोष्ट बोलून दाखविली आहे.

मला जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. मात्र बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर आणखी आनंद झाला असता, असं त्या म्हणाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मनातील सलच अप्रत्यक्षपणे बोलून दाखविली आहे. त्या नागपूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होत्या.

Anil Deshmukh : भाजपच्या सांगण्यावरूनच अक्षय शिंदेचा एन्काऊन्टर

मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती. अशा स्थितीत मला आणखी आनंद झाला असता. मला जालना येथील पालकमंत्री पद मिळाले आहे. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी अनुभव म्हणून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला मनासारखे काम करायला मिळेल, असे नसते, असंही त्या म्हणाल्या आहेत.

Maharashtra Congress : काँग्रेसचा अंतर्गत वाद टोकाला; एकमेकांना केले जातेय टार्गेट!

मी पूर्वी पाच वर्ष कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केले आहे. तो अनुभवदेखील पाठीशी आहेच, असे त्यांनी सांगितले. माझा पाच वर्षांतील कार्यकाळ बीड जिल्ह्यासाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहील. आता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीमध्ये जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. जालन्याकडे मला दुप्पट लक्ष द्यावे लागेल. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत, ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे.

धनंजय मुंडे यांच्याबाबत कोण, कोणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलत नाही. माझ्या भूमिकेवर मी बोलू शकेल असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भाष्य करण्याचे टाळले.

error: Content is protected !!