Ashish Shelar : बिनखात्याचा मंत्री राहीन पण शिक्षण विभागाचा मंत्री नको

ashish-shelar-comment-on-education-department-online-gaming-task-force : मंत्री आशिष शेलार यांची मिश्किल टिप्पणी, ऑनलाईन गेमिंगवर टास्क फोर्स जाहीर

Mumbai : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात विविध विषयांवर चर्चा रंगली असताना शिक्षण विभागासंदर्भातील एका प्रश्नावरून सभागृहात हास्यकल्लोळ उसळल्याचे पाहायला मिळाले. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या मिश्किल सल्ल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी “बिनखात्याचा मंत्री राहीन, पण शिक्षण विभागाचा मंत्री होणार नाही” अशी हलकीफुलकी टिप्पणी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला.

शिक्षण विभागाशी संबंधित लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना दादा भुसे यांनी पूर्वी शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळलेल्या आशिष शेलार यांनी पुन्हा हा विभाग घ्यावा, अशी मिश्किल सूचना केली. त्यावर तत्काळ प्रत्युत्तर देताना शेलार यांनी वरील टिप्पणी केली. त्यांच्या या उत्तरामुळे वातावरणातील ताण हलका झाला आणि काही क्षणांसाठी गंभीर चर्चेऐवजी विनोदी वातावरण निर्माण झाले.

Chandrapur Municipal Corporation : उद्धव ठाकरे म्हणतात, चंद्रपूरच्या युतीला माझी हरकत नाही

दरम्यान, सभागृहात ऑनलाईन गेमिंग ॲप्समुळे वाढणाऱ्या मानसिक तणाव आणि आत्महत्यांच्या घटनांवर गंभीर चर्चा झाली. आमदार निरंजन डावखरे यांनी हा मुद्दा उपस्थित करत आयटी कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी केली. एका लहान मुलाने आत्महत्येपूर्वी ‘लॉग आउट’ असा उल्लेख केल्याची घटना, आरे कॉलनीतील एका मुलीची आत्महत्या तसेच गाझियाबाद येथील तीन बहिणींच्या आत्महत्येचा संदर्भ देत त्यांनी या प्रकारांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली.

फक्त एखादे ॲप बंद करून उपयोग नाही. एक गेम बंद झाला तर तोच दुसऱ्या नावाने पुन्हा सुरू होतो. त्यामुळे संबंधित ॲप तयार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत आणि आयटी कायद्याच्या कलम 108 अंतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डावखरे यांनी केली. ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत असून शासनाने ठोस पावले उचलावीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, 2 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन गेमिंग संदर्भात टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये कायदा व न्याय विभागासह संबंधित सर्व यंत्रणांचा समावेश करण्यात आला असून पुढील अधिवेशनापूर्वी सविस्तर अहवाल सादर केला जाईल.

याशिवाय दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. पालकांनी ‘डिजिटल लिटरेसी’ अंगीकारणे आणि मुलांसाठी ‘डिजिटल डाएट’ निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ऑनलाईन गेमिंगचे व्यसन रोखण्यासाठी राज्यभर जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी सदस्यांना केले.

Ajit Pawar plane accident : पोलीस ठाण्यात तणाव; रोहित पवार, अमोल मिटकरी यांची पोलिसांशी बाचाबाची !

ई-स्पोर्ट्सला सकारात्मक दिशा देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मुंबईत आयोजित करण्याबाबतही सरकार स्तरावर विचार सुरू असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. ऑनलाईन गेमिंग, मुलांचे मानसिक आरोग्य आणि डिजिटल सुरक्षितता या तिन्ही मुद्द्यांवर व्यापक धोरणात्मक निर्णयाची गरज असल्याचे या चर्चेतून अधोरेखित झाले.

___