Guardian-minister-makrand-patil-rushed-to-Wai-immediately-after-President’s-departure : बुलढाणा पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर सवाल, राष्ट्रपतींच्या प्रस्थानानंतर लगेच गाठले वाई
Buldhana राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री मकरंद जाधव पाटील बुधवारी विदर्भपंढरी शेगाव येथे उपस्थित होते. मात्र, हा दौरा राजकीय वर्तुळात ‘टच अँड गो’ स्वरूपाचाच ठरल्याची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमातील मोजके बोलणे, औपचारिक अभिवादन आणि त्यानंतर लगेच वाईच्या दिशेने केलेले प्रस्थान, यामुळे विदर्भातील विकासकामांपेक्षा साताऱ्याच्या सत्ताकारणावरच मंत्र्यांचे अधिक लक्ष केंद्रित असल्याचे दिसून आले आहे.
या घाईगडबडीमागे साताऱ्यातील जिल्हा परिषद सत्तेची बेरीज-वजाबाकी असल्याचे बोलले जाते. महायुतीमध्येच सत्तापदासाठी अंतर्गत चुरस वाढली असून, भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या गोटात हालचाली वेगवान झाल्या आहेत. पडद्यामागे व्यूहरचना, सदस्यांशी संपर्क आणि ‘परंपरागत’ सहलींचे पर्याय—अशी सारी समीकरणं साताऱ्याच्या राजकारणात चर्चेत आहेत.
Bacchu Kadu : समस्या मांडून झाल्या, आता सरकारला जाब विचारणार
विदर्भातील महत्त्वाच्या कार्यक्रमापेक्षा साताऱ्याच्या राजकीय पटावरच अधिक लक्ष खिळल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे. शेगाव दौरा हा केवळ साचेबद्ध पद्धतीने आणि झपाट्याने उरकण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. आता साताऱ्यात कोणाची बेरीज जुळते आणि कोणाची वजाबाकी ठरते, यावरच महायुतीची पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.








