congress-to-decide-buldhana-district-president : अंतर्गत गटबाजीचे सावट, ठाकरे गटातून आलेल्या नेत्याचेही नाव आघाडीवर
Buldhana राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जिल्हास्तरावर व्यापक फेरबदलाचे संकेत मिळत असताना, प्रदेशाध्यक्षांच्या स्वजिल्ह्यात जिल्हाध्यक्षपदाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सध्या हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, संघटनात्मक फेरबदलासाठी विविध नावांवर जोरदार मंथन सुरू असल्याची माहिती आहे. केवळ नाव निश्चिती नाही, तर गट-तट आणि स्थानिक समीकरणांचा गुंता सोडवूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
पक्षातील काही चेहरे ठळकपणे पुढे येत असले तरी, अद्याप अंतिम नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. विशेषतः वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर कोणते नाव अधिकृतपणे पुढे येते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पक्षाला नवा राजकीय दृष्टिकोन देण्यासाठी आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा पर्यायही गंभीरपणे विचाराधीन आहे. संघटनात्मक मरगळ झटकण्यासाठी हा निर्णय कळीचा ठरणार आहे.
Dr. Sanjay kute : जळगाव जामोदमध्ये भाजप कार्यकर्त्यांना ठेकेदारीऐवजी जनहिताचा सल्ला
दरम्यान, उद्धवसेनेतील एका मातब्बर नेत्याच्या संभाव्य काँग्रेसप्रवेशाची चर्चा रंगली असून, या नव्या चेहऱ्याला पक्षात आणून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते का, या दृष्टीनेही चाचपणी सुरू आहे. यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि उत्सुकता अशा दोन्ही भावना आहेत. गट-तट आणि स्थानिक समीकरणांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
काँग्रेसने बाहेरील नेत्याला पक्षात घेऊन थेट जिल्हाध्यक्षपद दिले, तर पक्षात आधीपासूनच काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत, प्रदेशाध्यक्षांना एकाच वेळी नवीन समीकरणे जुळवतानाच पक्षातील जुन्या जाणत्यांनाही सोबत घेऊन चालण्याचे मोठे कसब दाखवावे लागणार आहे.
Akola Municipal Corporation : घाईघाईत 400 कोटींचे कंत्राट देण्यावरून आयुक्त अडचणीत
परिस्थिती अनुकूल ठरल्यास नव्या नेतृत्वाला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन संघटनाला नवचैतन्य देण्याचा पक्षाचा प्रयत्न असू शकतो. अधिकृत घोषणेनंतरच जिल्ह्यातील काँग्रेसची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे, परंतु तोपर्यंत चर्चांना उधाण आले आहे.








