Mayor-neglected-Party-leader-balya-borkar-for-naagnadi-review : महापौर, स्थायी समिती सभापती गेल्या नागनदीचा आढावा घ्यायला, सत्तापक्ष नेत्याला विचारलेही नाही
Nagpur नागपूर महापालिकेत महिला राज आले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापतिपदी महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विशेष समित्या महिला नगरसेवकांकडेच सोपवण्यात आल्या आहेत. याचा पहिला फटका सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांना बसला आहे.
त्यांना कुठलीच कल्पना न देता महापौर नीता ठाकरे आणि स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी परस्पर दौरा आखला. नागनदीची पाहणी केली. त्यावरून भाजपात आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हे अनावधाने झाले असे स्पष्टीकरण पक्षाच्यावतीने देऊन बाजू सावरण्यात येईल. मात्र यावरून भाजपात कुरबुरी सुरू झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ramrao wadkute : राष्ट्रवादीतून विधान परिषदेपर्यंतचा प्रवास आणि आता भाजपकडून राज्यसभेवर
नागपूर महापौरपदाची आरक्षणासाठी सोडत महिलेसाठी निघाली होती. त्यानंतर बाल्या बोरकर यांना सर्वप्रथम सत्तापक्ष नेते करून त्यांच्यावर महापालिका चालवण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. भाजपमध्ये सत्तापक्ष नेत्याला मोठा मान दिला जातो. अनिल सोले, प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, संदीप जोशी हे महापौर होण्यापूर्वी महापालिकेत सत्तापक्ष नेते होते.
त्यांच्या कार्यकाळात महापौर, स्थायी समितीचे सभापती कोणीही असले तरी सत्तापक्ष नेत्याला विचारूनच सर्व निर्णय घेतले जात होते. धोरणात्मक निर्णय घेताना तसे मोठे आर्थिक निर्णय घेताना सत्तापक्ष नेत्याची संमती घेतली जात होती. प्रत्येक फाईल सत्तापक्ष नेत्याच्या डोळ्याखालून पुढे पाठवली जात होती. निधी वाटपातही सत्तापक्ष नेत्याला विश्वासात घेतले जात होते.
Pm yojana audit : मोठा निर्णय, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे राज्यभर ऑडिट
भाजपात सत्तापक्ष नेता हा एक प्रकारे रिमोट कंट्रोल समजला जातो. मात्र महिला राज येताच आता सत्तापक्ष नेत्याचे महत्त्व कमी केले काय अशी विचारणा केली जात आहे. बुधवारी महापौर नीता ठाकरे यांनी गांधीबाग तर स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी सहकारनगर येथून नागनदीची पाहणी केली. त्यांच्यासोबत काही नगरसेवक व महापालिकेचे अधिकारी होते. सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांना विचारणा केली असता त्यांनी या दौऱ्याबाबत आपल्याला काही कल्पना नसल्याचे सांगितले.
Rajya sabha election : मोठी घोषणा: राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील ४ उमेदवार जाहीर
महापालिकेने नागनदीचा पाहणी दौरा आयोजित केला असले तर सत्तापक्ष नेता या नात्याने मला याची माहिती देणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही मला असा काही दौरा झाला, महापौर आणि स्थायी समितीच्या सभापती यांनी पाहणी केली याची माहिती नसल्याचे बोरकर यांनी स्पष्ट केले.








