Cm-devendra-fadnavis-clears-farmers-will-definately-get-loan-waiver : अंमलबजावणीवर देखरेखीसाठी समिती, जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार
Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. सप्टेंबर २०२५ पर्यंत असलेले दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या घोषणेनंतर, “राष्ट्रीयकृत बँकांची कर्जमाफी केली जाणार नाही” किंवा “घोटाळ्याचा आरोप असलेल्या जिल्हा सहकारी बँकांतून कर्ज घेतले असल्यास माफी मिळणार नाही” असे दावे केले जात होते. आज शनिवारी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. ज्या ज्या बँका, सोसायट्या आणि सहकारी बँकांना पीक कर्ज देण्याचे अधिकार आहेत, त्या सर्वांचे कर्ज माफ केले जाणार आहे. “ही माफी बँकांना नव्हे, तर शेतकऱ्यांना मिळावी याची आम्ही खबरदारी घेणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असल्याने आता कोणीही संभ्रम बाळगण्याची गरज नाही. घोषणा केल्याप्रमाणे जून महिन्यापर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, ती समिती कर्जमाफीचे नियोजन करत आहे. बँक कुठलीही असली, तरी तिला पीक कर्ज वाटपाचे अधिकार असल्यास कर्जमाफी दिली जाणार आहे. अर्थसंकल्पात संपूर्ण राज्यालाच भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. विदर्भासाठी ‘वैनगंगा-नळगंगा’ हा प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार असून सरकारने त्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण विदर्भाचे चित्र बदलणार असून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. भविष्यात विदर्भाला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.
Cm devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकाच प्रकल्पातून २५०० लोकांना मिळणार रोजगार
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होत असल्याच्या चर्चेकडे लक्ष वेधले असता, मुख्यमंत्र्यांनी अशा बातम्या प्रसारित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असा सल्ला दिला. या सर्व घडामोडींवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. सध्या कोणत्याही वस्तूची टंचाई निर्माण झालेली नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे. केंद्र सरकार संयमाने सर्व विषय हाताळत आहे; त्यामुळे माध्यमांनी कपोलकल्पित बातम्या प्रसारित करू नयेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
Old vehicles tax : जुनी वाहने मोडीत काढून नवी घेतल्यास करसवलत
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नागपूरमधील ‘लॉजिस्टिक व इंडस्ट्रियल पार्क’चे भूमिपूजन झाले. या पार्कमुळे जागतिक पुरवठा (ग्लोबल सप्लाय) व्यवसायाला मोठा फायदा होईल आणि नागपूरचे भौगोलिक महत्त्व पाहता विदर्भालाही याचा अतिरिक्त लाभ मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.








