nagpur-municipal-corporation-budget-will-also-women’s-special : आमदार-खासदारांच्या सौभाग्यवतींचा घेणार सल्ला
Nagpur नागपूर महापालिकेत महिला राज आले आहे. महापौर, उपमहापौरपदी महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. एवढेच नव्हे महत्त्वाची स्थायी समिती महिलेकडे सोपवण्यात आली आहे. सर्व १० विषय समित्यांचे सभापतिपदीसुद्धा महिलांना नेमण्यात आले आहे. आता त्यापुढे जाऊन सर्व एकत्रित आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे बजेटही महिला स्पेशल करण्याचे ठरवले आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे आणि स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी ही घोषणा केली आहे. यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात महिला अधिकारी, सनदी अधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती तसेच शहरातील खासदार व आमदार यांच्या सौभाग्यवती यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत त्यांच्या अपेक्षा व अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहेत.
Sindkhed raja development : ‘तीन शिलेदार’ विधिमंडळात; आता तरी विकासाचा वनवास संपणार का?
शहराच्या विकासाच्या दृष्टीने महिलांच्या सूचनांना व विचारांना स्थान मिळावे, तसेच महिलांच्या दृष्टिकोनातून शहरातील गरजा आणि प्राधान्यक्रम या चर्चासत्राच्या माध्यमातून समजून घेण्यात येणार आहे. नागपूर शहराच्या विकासात महिलांचा सहभाग आणि त्यांच्या सूचनांना महत्त्व देणे आवश्यक आहे. आगामी मनपा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख व सर्वसमावेशक व्हावा यासाठी महिलांचे मत जाणून घेण्यात येत असल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे यांनी दिली.
MLA Siddharth Kharat : विद्यमान आमदारांचे गावोगावी दौरे, माजी आमदारांनी मुंबईत ठाण मांडले!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सातत्याने नागपूर महापालिकेचा मोठा निधी प्राप्त होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोट्यवधींचे प्रकल्प शहरात राबवत आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प पाच हजार कोटींच्या घरात गेला आहे. साडेतीन वर्ष शहरात प्रशासक होते. त्यामुळे भाजपला तब्बल चार वर्षानंतर अर्थसंकल्प मांडण्याची संधी यावेळी पुन्हा उपलब्ध झाली आहे. महापालिकेत भाजप निवडून आल्यानंतर हे पहिलेच बजेट असणार आहे.








