booster-dose-to-the-development-of-sindkhed-raja-dcm-sunetra-pawar-assures : विधानभवनात झाली बैठक, विकासकामांना गती देण्याचे निर्देश
sindkhed raja ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य पातळीवर हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासोबत विधानभवन येथे झालेल्या बैठकीत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली असून विकासकामांना गती देण्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळाले आहे.
या भेटीत आमदार मनोज कायंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काजी यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा मांडत सिंदखेडराजासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा केली. शहरासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, सिंचन प्रकल्प आणि पर्यटन विकासाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
Devendra fadnavis : महाराष्ट्र नावाचा वेगळा देश असता तर…, फडणविसांचे मोठे विधान
सिंदखेडराजा शहराचा कायापालट करण्यासाठी केवळ निधी पुरेसा नसून प्रशासनाने प्रत्यक्ष आढावा घेणेही तितकेच गरजेचे असल्याचे मत आमदार मनोज कायंदे आणि अॅड. नाझेर काजी यांनी व्यक्त केले. यासाठी सिंदखेडराजा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष प्रशासकीय बैठक आयोजित करण्याची विनंतीही त्यांनी केली. या मागणीला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अशी बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बैठकीत शहरातील रस्ते, वीज व पाणीपुरवठा, तसेच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्याबाबतही चर्चा झाली. पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता सिंदखेडराजाच्या विकासासाठी व्यापक आराखडा राबवण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
Amravati university : सिनेट सभेत अभाविपचे ठिय्या आंदोलन; विद्यापीठाचे वाढले टेंशन
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी, “सिंदखेडराजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आवश्यक निधी तसेच प्रशासकीय मान्यता प्राधान्याने देऊन प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यात येतील,” असा विश्वास व्यक्त केला. या सकारात्मक संकेतांमुळे सिंदखेडराजा मतदारसंघातील विकासकामांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, आता प्रस्तावित प्रशासकीय बैठकीकडे स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे.








