व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र PM mitra textile park : नेदरलँडची कंपनी करणार विदर्भातील कापसावर प्रक्रिया

PM mitra textile park : नेदरलँडची कंपनी करणार विदर्भातील कापसावर प्रक्रिया

nedarland-company-to-process-vidarbha-cotton-under-pm-mitra-textile-park : अमरावतीच्या ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’ची केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांकडून पाहणी

Amravati नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’ची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी शुक्रवारी (दि. १३) पाहणी केली. देशातील सात राज्यांमध्ये विकसित होत असलेल्या टेक्सटाईल पार्कपैकी अमरावती येथील पार्कच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र शासनाचे उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू उपस्थित होते. यावेळी एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा दिला.

Uday samant : उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा लेखाजोखा जाहीर होणार !

सुमारे १ हजार २० एकर क्षेत्रावर विकसित होत असलेल्या या पार्कमध्ये रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, केबलिंग, पथदिवे, पाणीपुरवठा यंत्रणा तसेच सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आदी पायाभूत सुविधा कार्यान्वित झाल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
विशेष म्हणजे, या प्रकल्पांतर्गत १०० एकर क्षेत्रावर एमआयडीसीतर्फे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. तसेच नेदरलँडमधील ‘मेसर्स टीटीवायएम मॅनेजमेंट बी.व्ही.’ या कंपनीमार्फत कापूस प्रक्रिया तसेच संशोधन व विकास केंद्र स्थापन करण्यासाठी ६६ एकर जमिनीवर पहिली परकीय गुंतवणूक प्रस्तावित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!