motala-buldhana-party-workers-joins-shivsena-ubt-mumbai-matoshree : सरपंच, माजी सरपंचांसह महिला पदाधिकाऱ्यांचाही समावेश
Buldhana बुलढाणा विधानसभा मतदारसंघासह मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात मोताळा तालुक्यातील अंत्री, वडणी चिंचखेड, लिहा, गिरोली, दाभा, निमखेड यांसह जयपूर, तिघ्रा, परडा, शिरवा, चिंचपूर, आव्हा आणि नाईकनगर या गावांतील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. तसेच बुलढाणा तालुक्यातील तांदळुवाडी, सव, अंत्री तेली, खुपगाव आणि डोंगरखंडाळा परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही पक्षात प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा मोठा समावेश असल्याने ग्रामीण भागातील पक्षीय रचनेत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
Devendra fadnavis : जगातील संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचे अमेरिकेतील नेत्यांचेही मत
महिला आघाडीच्या माध्यमातूनही अनेक महिला कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला. यामध्ये अनिताताई गायकवाड, शोभाताई रिंढे, मीराबाई बहादरे यांच्यासह अन्य महिला प्रतिनिधींचा समावेश होता. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रवक्ता ॲड. जयश्री शेळके, गजानन वाघ, जिल्हा समन्वयक प्रा. डी. एस. लहाने, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजयाताई खडसान यांसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आगामी राजकीय संघर्षात कोणती भूमिका निर्णायक ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








