Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा प्रशासनाच्या उदासीनतेवर सभागृहात कडक प्रहार

sudhir-mungantiwar-attacks-administration-for-negligance-in-public-works : चौफेर विकास, रोजगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

chandrapur लोकशाहीत योजना आणि घोषणा कितीही चांगल्या असल्या तरी त्यांची खरी कसोटी अंमलबजावणीतच असते. जनतेपर्यंत सुविधा वेळेवर पोहोचल्या आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने काम केले तरच विकासाची गती टिकून राहते. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेकदा सामान्य नागरिकांच्या अपेक्षा अपूर्ण राहतात. याच पार्श्वभूमीवर, सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध जनहिताच्या मुद्द्यांवर ठाम आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत सभागृहाचे लक्ष वेधले. चौफेर विकास, रोजगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, आदिवासी समाजाच्या तसेच शहर व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर सभागृहात कडक प्रहार केला.

या चर्चांदरम्यान मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नेमके प्रश्न उपस्थित करत अनेक महत्त्वाच्या विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती निधीचे वेळेवर वितरण, महिलांच्या सक्षमीकरणासाठी संस्थांना पुरेसा निधी व अधिकार, तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आदी मुद्यांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली. जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ वेळेवर पोहोचावा यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि तत्परतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sudhir mungantiwar : महाराष्ट्र विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ सादर

चंद्रपूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाच्या दृष्टीनेही त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे आणले. नवीन चंद्रपूर शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास, शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन चंद्रपूर रिंग रोडसारख्या पायाभूत प्रकल्पांची गरज या विषयांवर उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, याकडे देखील त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. वाढती वाहतूक, अपघातांची समस्या आणि औद्योगिक वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता नियोजनबद्ध पायाभूत सुविधांची उभारणी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Sudhir Mungantiwar : आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याच हवा; सेवा केली नाही तर वेतन कपात करा

याशिवाय जनहिताच्या विविध विषयांवर प्रशासनाने निर्णय प्रक्रियेला गती देत अधिक उत्तरदायी आणि संवेदनशील पद्धतीने काम करावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी सभागृहातून दिला. योजनांची घोषणा पुरेशी नसून त्या प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे, असे ते ठामपणे म्हणाले.

Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा !

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या चर्चेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात ते कायम आघाडीवर असतात. प्रशासनाच्या उदासीनतेवर कडक प्रहार करत त्यांनी विकास, सुविधा आणि जनकल्याणाच्या कामांना गती देण्याचा ठोस संदेश सभागृहातून दिला. त्यामुळेच त्यांचा आवाज हा केवळ एका मतदारसंघाचा किंवा जिल्ह्याचा नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांचा आवाज ठरत आहे.