Vikas thakre vs narendra jichkar : काँग्रेसची ठाकरे सेना आता जिचकारांच्या आर्थिक नाड्या आवळणार !

Vikas-thakre-group-opposing-contract-given-to-narendra-jichkar-company : जिचकार यांच्या कंपनीला दिलेल्या कंत्राटाला विरोध, स्थायी समिती सभापतींना निवेदन

Nagpur काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि काँग्रेसने निलंबित केलेले नरेंद्र जिचकार यांच्यातील वैर अद्यापही शमलेले नाही. विधानसभेच्या निवडणुकीत जिचकार यांनी निवडणुकीत उडी घेऊन ठाकरे यांना थेट आव्हान दिले होते. याचा वचपा आता जिचकारांच्या आर्थिक नाड्या आवळून काढला जाणार असल्याचे दिसून येते. जिचकारांच्या अंजनीकृपा लॉजिस्टिकला महापालिकेने देऊ केलेल्या खड्डे बुजवण्याच्या कंत्राटाला काँग्रेस नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या बैठकीतीत हॉटमिक्स प्लांट विभागामार्फत जेट पॅचर मशीनच्या सहाय्याने शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम खासगी कंत्राटदारामार्फत करण्यासाठी सुमारे एक कोटी ४३ लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर काॅंग्रेसच्या स्थायी समितीतील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

Devendra Fadnavis: नागपूरचे ‘वॉकेबल स्ट्रीट’ की ‘ड्रग्स स्ट्रीट’? आता थेट पोलिस निरीक्षकालाच जबाबदार धरणार

या संदर्भात स्थायी समितीत असलेले काँग्रेस सदस्य अभिजीत झा, वसीम खान, मारिस्टेला उसरे व अभिषेक शंभरकर यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले असून सदर विषय रद्द करण्याची मागणी केली आहे. या कामासाठी अंजनीकृपा लॉजिस्टिक्स या कंत्राटदार कंपनीला एक कोटी २५ लाखाच्या खर्चाचे काम देण्याचा प्रस्ताव आहे.

काँग्रेस सदस्यांनी आपल्या निवेदनात गंभीर बाबी मांडताना नमूद केले आहे की, सदर कंत्राटदार कंपनी मागील १४ वर्षांपासून सातत्याने नागपूर महानगरपालिकेची कामे करीत आहे. आतापर्यंत ६० कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे या कंपनीला देण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व काही मनपा अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीचे संचालक नरेंद्र जिचकार हे असून त्यांची पत्नी डॉ. शिल्पा नरेंद्र जिचकार गेल्या १६ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत आहेत.

Vidarbha sahitya sangha : ‘टपाल’ मतपत्रिकेवरून वादाचा धुरळा; ‘ती’ २ हजार मते कुणाची?

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५९ नुसार अशा प्रकारच्या हितसंबंधाच्या प्रकरणात संबंधित संस्था कंत्राटासाठी अपात्र ठरते असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात यापूर्वी २०११ मध्येही स्थायी समितीने अशाच प्रकरणात कंत्राट नाकारल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित कंत्राटदारावर नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती देण्यात आली असून अशा वादग्रस्त व कायदेशीर अडचणीत असलेल्या संस्थेला सार्वजनिक काम देणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिकेकडे स्वतःचा अत्याधुनिक हॉटमिक्स प्लांट उपलब्ध असताना पथदुरुस्तीचे काम बाह्य कंत्राटदारामार्फत देणे पूर्णपणे अनावश्यक आहे. तसेच जेट पॅचर पद्धतीने करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आले असून अशा कामांमुळे खड्डे अल्पावधीत पुन्हा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार प्राप्त होत आहे.

Chandrakant patil : अनुदानित महाविद्यालयांत प्राध्यापकांची मोठी भरती

२०१२ पासून सदर कंत्राटदाराला देण्यात आलेल्या सर्व कामांची व करण्यात आलेल्या देयकांची सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधितांवर गुन्हे दाखल करून सार्वजनिक निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणीही काँग्रेस सदस्यांनी केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता या विषय तत्काळ रद्द करण्यात यावा, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली आहे.