name-change-proposal-for-amravati-municipal-corporation-submitted-to-government : मुख्य सचिवांच्या निर्णयाकडे लक्ष, रवी राणांच्या युवा स्वामी यांनी पक्षाचा पुढाकार
Amravati अमरावती महानगरपालिकेचे “अमरावती-बडनेरा महानगरपालिका” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर होऊन तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर व कायम करण्यात आला होता.
युवा स्वाभिमान पक्षाचे गटनेते नाना आमले आणि नगरसेवक प्रा. प्रशांत वानखडे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी तसेच विरोधी पक्षानेही अनुमोदन दिले. त्यानुसार महानगरपालिकेच्या प्रशासनाने मंजूर ठरावाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी २६ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाकडे पाठविली आहे. सध्या ही फाइल राज्याच्या मुख्य सचिवांकडे निर्णयासाठी प्रलंबित असल्याची माहिती आहे.
Rupali chakankar : भोंदूबाबा प्रकरणाचा फटका; रुपाली चाकणकरांचा राजीनामा
दरम्यान, आमदार रवी राणा हे या नामकरणासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करत असून, त्यांच्या प्रयत्नांना यश येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेत प्रस्ताव मांडताना राज्यातील इतर महानगरपालिकांचे संयुक्त नामकरण असल्याचे उदाहरण देण्यात आले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले, बबलू शेखावत, भाजपचे पक्षनेते चेतन गावंडे, शिंदेसेनेचे डॉ. राजेंद्र तायडे आदींनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला.
अमरावती-बडनेरा असे नामकरण करण्याचा प्रस्ताव यापूर्वी २०११ आणि २०१५ मध्येही महापालिका सभागृहात मंजूर झाला होता. दिवंगत नगरसेवक पुरुषोत्तम येते, विजय नागपुरे, माजी नगरसेविका डॉ. कांचन ग्रेसपुंजे आणि माजी नगरसेवक प्रकाश बनसोड यांच्या कार्यकाळात हे प्रस्ताव मंजूर झाले होते. मात्र, त्यावेळी शासनाकडे प्रभावी पाठपुरावा न झाल्याने कोणतीही पुढील कार्यवाही झाली नव्हती.
Sudhir mungantiwar : पुनर्वसनाशिवाय घराला हात लावू नका, मुनगंटीवारांचा इशारा !
शासनस्तरावर आमदार रवी राणा जोरकस प्रयत्न करत आहेत. आमचाही पाठपुरावा सुरू असून नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सध्या फाइल मुख्य सचिवांकडे आहे. येत्या काळात बडनेरावासीयांना आनंदाची बातमी मिळेल, अशी अपेक्षा युवा स्वाभिमान पक्षाचे गटनेते नाना आमले यांनी व्यक्त केली आहे.








