Nagpur people get panicked by the petrol crisis, long que on petrol pump : अनेक ठिकाणचा साठा संपला, पेट्रोल-डिझेल संपल्याचे फलक झळकले.
Nagpur अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने त्याचे थेट पडसाद आता स्थानिक स्तरावर उमटू लागले आहेत. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यानंतर आता नागपूर शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. पेट्रोल संपणार या भीतीपोटी नागरिकांनी पंपांवर गर्दी केल्यामुळे अनेक ठिकाणचा साठा संपला असून, काही पंपांवर ‘पेट्रोल संपले’ असे फलक झळकू लागले आहेत. हे आगामी मोठ्या संकटाचे संकेत मानले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत युद्धाच्या परिस्थितीवर सविस्तर निवेदन दिले. या युद्धाचे दुष्परिणाम दीर्घकाळ जाणवणार असून, कोरोना काळाप्रमाणे सर्वांनी संयम राखावा,असे आवाहन त्यांनी केले. मात्र, या निवेदनानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी पेट्रोल पंपांवर धाव घेतली. आज सकाळपासूनच नंदनवन, बैद्यनाथ चौक, पंचशील चौक आणि इतर प्रमुख भागांतील पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी दिसून आली. अनेक वाहनधारकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन भरून घेतल्याने, पंपांवरील दोन दिवसांचा कोटा एकाच दिवसात संपला आहे.
हीच स्थिती कायम राहिल्यास शहरात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ असे आवाहन केले असले, तरी प्रत्यक्षात गॅस सिलिंडरचे रेशनिंग सुरू झाले आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादित केल्याने अनेक हॉटेल्स आणि खानावळी बंद झाल्या आहेत. नागरिक आता चुली किंवा ‘इंडक्शन’ शेगडीचा वापर करू लागले आहेत.
Sanjay raut : सातारा प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडण्याचे संकेत !
घरगुती गॅससाठी आता महिनभराचे अंतर राखणे आणि ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात असली, तरी पेट्रोल-डिझेलच्या संभाव्य टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे. जर ही परिस्थिती सुधारली नाही, तर कोरोना काळाप्रमाणे पुन्हा एकदा सर्व व्यवहार ठप्प होण्याची टांगती तलवार नागपूरकरांवर आहे.








