sushma-andhare-vs-shital-mhatre-twitter-war-ashok-kharat-case-taj-ka-raaj-maharashtra-politics : अशोक खरात प्रकरणावरून ट्विटरवर महिला नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप
Mumbai: मुंबईत अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून आता या मुद्द्यावरून महिला नेत्यांमध्येही थेट शब्दयुद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्यात सोशल मीडियावर जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
शितल म्हात्रे यांनी ट्विट करत ‘ताज का राज’ या उल्लेखासह ठाकरे कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. अशोक खरात प्रकरणाशी संबंधित काही निर्णय आणि ताज हॉटेलमध्ये झालेल्या कथित बैठकीबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी पाण्याच्या जोडणीसंदर्भात गंभीर आरोप केले. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
India lpg petrol diesel : देशात एलपीजी, पेट्रोल-डिझेल टंचाईची भीती निराधार!
या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी शितल म्हात्रेंवर थेट पलटवार केला. “विषय भरकटवू नका, आपण तुमच्यावरच चर्चा करत आहोत” असे म्हणत त्यांनी पूर्वी चर्चेत आलेल्या व्हिडिओ प्रकरणाचा उल्लेख केला. “तुम्ही म्हणाला होता की तुमचा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला आहे, तर त्या प्रकरणातील मूळ व्हिडिओ सापडला का?” असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.
अंधारेंच्या या प्रश्नाला उत्तर देताना शितल म्हात्रे यांनीही आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांनी पुन्हा ‘ताज का राज’ या मुद्द्यावर भर देत अशोक खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताज हॉटेलमध्ये बैठक कोणी घेतली, त्यामागे कोणता नेता होता, आणि त्यासाठी आदेश कोणी दिले, असे प्रश्न उपस्थित केले. या मुद्द्यांवरच चर्चा व्हायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
Farmer id : शेतरस्त्यांवर अतिक्रमण केल्यास 5 वर्षे ‘फार्मर आयडी’ ब्लॉक !
याचबरोबर त्यांनी सुषमा अंधारेंवर वैयक्तिक टीकाही केली. त्या काळात तुम्ही शिवसेनेत नव्हत्या आणि इतर राजकीय कृतींमध्ये व्यस्त होतात, त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची माहिती नसण्याची शक्यता आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “ज्यांच्या आदेशाने तुम्ही बोलत आहात, त्यांनाच ‘ताज का राज’ विचारा” असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर या वादाला अधिक धार मिळाल्याचे दिसून येत आहे. अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता सोशल मीडियावरील या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
___








