LPG Crisis : गॅस पुरवठा विस्कळीत; अकोल्यात एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा

Long queues of public outside gas agencies in Akola : वितरकांची आमदारांसमोर कैफियत, टंचाई नसल्याच्या दाव्याचे काय?

Akola शहरासह जिल्ह्यात गॅस सिलिंडरची टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी प्रत्यक्षात मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पुरवठ्यामुळे शहरातील विविध गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गॅस वितरकांनी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. वितरकांच्या म्हणण्यानुसार, दररोजच्या बुकिंगच्या तुलनेत कमी प्रमाणात गॅस सिलिंडर मिळत असून तोही दोन दिवसाआड पुरवठा केला जात आहे. त्यामुळे बुकिंगनंतर १० ते १२ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी निर्माण झाला आहे.

Ashok Kharat case : खरातकडे २ हजार कोटींची माया; मंत्रालयातील अनेकांचे काळे धन पांढरे करण्याचा ‘अड्डा’?

यावर प्रतिक्रिया देताना आमदार पठाण यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली. “गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याची आकडेवारी चुकीची आहे. वितरकांना पुरेसा साठा मिळाल्यासच ते नियमित वितरण करू शकतील. आतापर्यंत काळाबाजाराच्या तक्रारी नसताना एजन्सींवर दोषारोप करणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच “जनतेने पॅनिक होऊ नये, असे सांगण्यापेक्षा प्रशासनाने परिस्थिती सुधारावी,” असेही ते म्हणाले.

Operation Tutari : ‘ऑपरेशन तुतारी’ निव्वळ अफवा! मला कोणाचाही फोन आला नाही

दरम्यान, नव्या नियमांनुसार गॅस बुकिंग कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांवर गेला आहे. तसेच एका एजन्सीकडे पूर्वी १०० ते १५० सिलिंडरची बुकिंग होत असताना आता ती संख्या वाढून ४०० ते ४५० वर पोहोचली आहे. मात्र, दैनंदिन पुरवठा केवळ ३०० ते ३६० सिलिंडरपर्यंत मर्यादित असून तोही नियमित नसल्याने वितरण व्यवस्थेवर ताण वाढला आहे.
ऑनलाइन बुकिंगनंतरही काही दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागत असल्याची माहिती अनेक ग्राहकांना नसल्याने बुकिंग केल्यानंतर तात्काळ सिलिंडर मिळावा, अशी अपेक्षा ठेवली जाते. परिणामी, एजन्सीसमोर गर्दी आणि रांगा वाढत असल्याचेही वितरकांनी स्पष्ट केले.