व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Kishor kumeriya : उद्धव सेनेचे महानगरप्रमुख किशोर कुमेरिया यांना अटकेचे वॉरंट, पोलिसांपासून...

Kishor kumeriya : उद्धव सेनेचे महानगरप्रमुख किशोर कुमेरिया यांना अटकेचे वॉरंट, पोलिसांपासून वाचण्यासाठी ‘मेडिकल’चा आश्रय!

Arrest warrant against uddhav Thackeray Shivsena leader kishor kumeriya: जुन्या प्रकरणात न्यायालयाची कारवाई, अडचणी वाढल्या

Nagpur उद्धव ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी केले असून, ही अटक टाळण्यासाठी कुमेरिया गेल्या दोन दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल झाले आहेत. सक्करदरा पोलीस सध्या कुमेरियांच्या डिस्चार्जची वाट पाहत असून, रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

एका जुन्या वादातून झालेल्या भांडणाप्रकरणी कुमेरिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतर, कुमेरिया यांनी ते रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता ओळखून गुरुवारी कुमेरिया वैद्यकीय कारणास्तव ‘मेडिकल’मध्ये उपचारासाठी दाखल झाले. सक्करदरा पोलिसांनी कुमेरिया यांच्या विरोधात वॉरंट असल्याची पुष्टी केली आहे, मात्र हे वॉरंट नेमक्या कोणत्या प्रकरणात आहे, याची अधिकृत माहिती अद्याप गोपनीय ठेवली आहे.

Baramati by-polls : बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’; नाना पटोलेंचा लढण्यास विरोध, तर सपकाळ-वडेट्टीवार ठाम!

राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उद्धव सेनेचे केवळ दोनच नगरसेवक निवडून आले होते, ज्यात किशोर कुमेरिया यांचा समावेश आहे. या निवडणुकीनंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत ‘महानगरप्रमुख’ पदावर त्यांची नियुक्ती केली. यापूर्वी त्यांनी नागपूरचे उपमहापौर पद भूषवले असून, दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली आहे. शहरातील अत्यंत आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरप्रमुखालाच अटकेचे वॉरंट निघाल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!