व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Iran war update : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने सुनावले खडे बोल; होर्मुज...

Iran war update : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने सुनावले खडे बोल; होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ठेवली अट, भारताचीही चिंता वाढली..

After Donald Trump’s threat, Iran issued a strong warning : ट्रम्प यांच्या बेजबाबदार निर्णयांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण झाल्याचा संताप

Mumbai मंगळवार सायंकाळपर्यंत होर्मुज सामुद्रधुनी खुली करावी, अन्यथा वीज निर्मिती केंद्रांवर आणि पुलांवर हल्ले करू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली होती. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले होते. मात्र, आता ट्रम्प यांच्या धमकीचा इराणवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. या धमकीनंतर इराणने होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेसमोर मोठी अट ठेवली आहे. विशेष म्हणजे, या अटीमुळे भारताची चिंता वाढली आहे.

इराणच्या राष्ट्रपती कार्यालयाशी संबंधित अधिकारी मेहदी तबातबाई यांनी सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनी तेव्हाच खुली होईल, जेव्हा इराणला युद्धातील नुकसानाची भरपाई मिळेल. याशिवाय, इराणच्या संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर गलीबाफ यांनीही ट्रम्प यांना खडे बोल सुनावले. ट्रम्प यांच्या बेजबाबदार निर्णयांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यांचा प्रत्येक निर्णय अमेरिकेच्या नागरिकांना नरकाच्या दिशेने घेऊन जात आहे, असं त्यांनी म्हटलं.

Nitin Gadkari : अब्दुल रेहमान अंतुले मुळचे ‘करंदीकर’ ब्राह्मण; नितीन गडकरींच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

ट्रम्प यांनी इराणला होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इशारा दिला होता. मंगळवार सायंकाळपर्यंत काहीही निर्णय झाला नाही, तर इराणमध्ये ना वीज प्रकल्प शिल्लक राहतील, ना पूल सुरक्षित राहतील, असेही त्यांनी म्हटले होते. याशिवाय, सोमवारी इराणसोबत होर्मुज सामुद्रधुनीबाबत करार होण्याची शक्यता असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

Akola congress : विद्यमान अध्यक्षांवर नाराजी, अकोल्यात काँग्रेसला मिळणार नवीन नेतृत्व?

दरम्यान, इराणच्या अटीनंतर आता होर्मुज सामुद्रधुनी लवकर खुली होण्याची शक्यता कमी झाली आहे. या तणावाचा परिणाम भारतावरही होणार आहे. सध्या देशात इंधनाचा तुटवडा दिसत नसला, तरी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सरकारने यासाठी पर्यायी उपाययोजना सुरू केल्या आहेत, मात्र त्या पुरेशा नाहीत. तसेच, मध्य पूर्वेतून येणाऱ्या खतांच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. होर्मुज सामुद्रधुनी लवकर खुली झाली नाही, तर खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!