व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसाठी पटेल-तटकरेंनी फोन फिरवण्याचेही टाळले;...

Vijay Wadettiwar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसाठी पटेल-तटकरेंनी फोन फिरवण्याचेही टाळले; राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षावर वडेट्टीवारांचा टोला

Congress leader claims internal conflicts within NCP Ajit Pawar: अजित पवारांच्या हयातीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला तटकरे आणि पटेलांनी विरोध केल्याचा दावा

Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, पक्षाचे दोन बडे आधारस्तंभ प्रफुल्ल पटेल praful patel आणि सुनील तटकरे sunil tatkare यांना पद्धतशीरपणे बाजूला सारले जात असल्याचा खळबळजनक दावा विधानसभा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सुनेत्रा पवार sunetra pawar बिनविरोध निवडून याव्यात यासाठी या दोन्ही नेत्यांनी इतर कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना फोन केला नाही, कारण आपलं कोणी ऐकणार नाही हे त्यांना ठाऊक होतं, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी या दोन्ही नेत्यांच्या राजकीय असहायतेवर बोट ठेवले.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पक्षातील भवितव्य सध्या धोक्यात असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी पटेल आणि तटकरे यांनी यापूर्वी काढलेले अनेक आदेश रद्द करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावरून पक्षात सध्या मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, वडेट्टीवार यांनी याच मुद्द्यावरून टोलेबाजी केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी, सध्या जे चित्र दिसत आहे त्यावरून या दोन्ही नेत्यांचे काही खरं वाटत नाही. पटेल आणि तटकरे यांचे भाजपशिवाय पान हलत नाही, हेच आजचे वास्तव आहे.

Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा, भाजप आक्रमक

अजित पवार जेव्हा ४० आमदारांसह बाहेर पडले होते, तेव्हा ही संपूर्ण यंत्रणा पटेल आणि तटकरे यांनीच हलवली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, ज्याला या दोन्ही नेत्यांचा तीव्र विरोध होता. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही गट एकत्र येतील असे दावे केले जात होते, मात्र पटेल-तटकरे यांनी ते फेटाळून लावले. हीच ताठर भूमिका आता त्यांच्या अंगलट आली असून, नव्या कार्यकारिणीत त्यांना स्थान न मिळणे हा त्याचाच परिणाम असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

Salil deshmukh : शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यातून सलील देशमुख निर्दोष मुक्त; राजकीय पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष

सुनेत्रा पवारांच्या वाढत्या प्रभावामुळे पटेल आणि तटकरे यांचे महत्त्व कमी झाले असून, झाकली मूठ सव्वालाखाची ठेवत या नेत्यांनी आता मौन बाळगणे पसंत केले आहे. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादीतील ही अंतर्गत वॉर आगामी काळात कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!