व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Deulgao raja municipal council : स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत गाजले अतिक्रमण

Deulgao raja municipal council : स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत गाजले अतिक्रमण

encrochment, sanitation, water supply key subjects discussed in standing committee first meeting : स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अतिक्रमणांवर जोरदार चर्चा

Deulgao raja नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत शहरातील मूलभूत सुविधांचा सर्वंकष आढावा घेत स्वच्छता, पाणीपुरवठा, अतिक्रमणे, कर वसुली आणि प्रकाश व्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देत प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

शहरातील स्वच्छतेची सद्यस्थिती, काही प्रभागांमध्ये जाणवणारे दुर्लक्ष आणि नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी यावर बैठकीत गंभीर चर्चा झाली. गटारे नियमित स्वच्छ ठेवणे, ओला व सुका कचरा वेगळा करण्याची शिस्त पाळणे आणि स्वच्छता यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

पाणीपुरवठा वेळेवर व सुरळीत राहावा यासाठी वितरण व्यवस्थेचे नियोजन अधिक काटेकोरपणे राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. वाढत्या तापमान आणि हवामानातील बदलाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यावरही विशेष भर देण्यात आला.

Water crisis : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मेहकर तालुका तहानलेलाच

बैठकीत शहरातील वाढत्या अतिक्रमणांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने राबवून पुढील कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले. तसेच खाजगी बांधकामे नियमांच्या चौकटीत राहूनच व्हावीत, यासाठी परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जबाबदार करण्यावर भर देण्यात आला.

शहरात वारंवार उद्भवणाऱ्या तक्रारी, आंदोलने आणि उपोषणांच्या पार्श्वभूमीवर काही प्रकरणांची छाननी करण्यात आली. मागील काळातील गंभीर अतिक्रमण प्रकरणांचा आढावा घेत पुढील कार्यदिशा निश्चित करण्यात आली. कर विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेऊन ३१ मार्चपर्यंतच्या वसुलीची माहिती समितीसमोर सादर करण्यात आली.

Uddhav Thackeray Shivsena : आधी नाकारले, आता थेट जिल्हाप्रमुख केले; चर्चा तर होणारच!

याशिवाय शहरातील बंद पडलेले दिवे आणि अपुरी प्रकाश व्यवस्था तातडीने सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जुन्या नगरपालिका इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने परिसरात निर्माण झालेल्या अस्वच्छतेची दखल घेत संबंधित ठिकाणाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

error: Content is protected !!