व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashok kharat case : १६० जीबी डिजिटल पुरावे, प्रत्येकाला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल...

Ashok kharat case : १६० जीबी डिजिटल पुरावे, प्रत्येकाला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल सादर

ashok-kharat-crime-news-nashik-160gb-digital-evidence-sit-forensic-report : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा

Nashik : नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या डिजिटल पुराव्यांमुळे धक्कादायक बाबी उघड होत असून, एकूण १६० जीबी इतका मोठा डेटा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात फॉरेन्सिक तपास पूर्ण करून अहवाल विशेष तपास पथकाकडे सादर करण्यात आला असून, त्यामुळे तपासाला अधिक वेग आला आहे. या पुराव्यांमुळे अशोक खरातभोवतीचा कारवाईचा फास आणखी घट्ट होत असल्याचे चित्र दिसत आहे.

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या चार डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये ३२ जीबी क्षमतेचे आणि १९ फोल्डर्स असलेले तीन पेन ड्राइव्ह, ६४ जीबी क्षमतेचे ओटीजी पेन ड्राइव्ह तसेच एक लॅपटॉप यांचा समावेश आहे. या सर्व डिजिटल माध्यमांमधील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक पथकाने बारकाईने तपासून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले साक्षीदारांचे जबाब आणि पीडितांचे निवेदनही नोंदवण्यात आले आहे.

District Bank elections : आजोबा, वडील आणि आता नातू… जिल्हा बँकेवर घराणेशाहीची मोहोर!

विशेष म्हणजे, तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या प्रत्येक डिजिटल पुराव्याला ए, बी आणि सी असे कोडवर्ड देऊन त्यांचे वर्गीकरण केले आहे. यामध्ये ‘ए’ कोडवर्ड अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या डेटामध्ये या कथित गैरप्रकारांचा तपशील आढळून आला आहे.

दरम्यान, अशोक खरात विरोधातील तिसऱ्या गुन्ह्यात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने खरातने पीडित महिलेला फसवून, तिला मुलगा होईल असे सांगत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप मांडला. या युक्तिवादानंतर न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

Vikas Thakre : विकास ठाकरेंची ‘इनिंग’ संपणार? शहर काँग्रेसच्या नव्या ‘कॅप्टन’साठी निरीक्षक नागपुरात!

सध्या या प्रकरणातील डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे तपास यंत्रणा अधिक पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतल्या असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!