Buldhana may get two new Legislative Assembly constituency after delimitation : बुलढाणा जिल्ह्यात दोन नवे विधानसभा मतदारसंघ वाढण्याची शक्यता
Buldhana देशभरात जनगनना सुरू होणार असून त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचना होण्याची शक्यता आहे.या परिसिमनानंतर बुलढाणा जिल्ह्यात दोन नवे विधानसभा मतदारसंघ वाढू शकतात, अशी चर्चा प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. देशव्यापी स्तरावर २०२६ नंतरच्या पहिल्या जनगणनेच्या आकडेवारीनंतरच पुढील परिसीमन शक्य असल्याचे घटनात्मक संकेत आहेत, त्यामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या हालचालींना अधिक वेग येऊ शकतो.
प्रशासकीय चर्चेनुसार, नव्या लोकसभा आराखड्यात भौगोलिक सलगता, प्रशासकीय सोय आणि मतदारांचा लोकप्रतिनिधींशी सुलभ संपर्क यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार बुलढाण्यासाठी दोन संभाव्य लोकसभा गट चर्चेत आहेत. पहिल्या गटात चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, वाशिम, रिसोड आणि मंगरूळपीर, तर दुसऱ्या गटात जळगाव जामोद, खामगाव, मलकापूर, बुलढाणा, मुक्ताईनगर आणि रावेर किंवा बाळापूर यांचा समावेश होऊ शकतो. या संभाव्य बदलांमुळे जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar accident : अमोल मिटकरींचे ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलन; राज्यभर फिरणार
विधानसभा पातळीवरही मोठे फेरबदल अपेक्षित असून, सध्या तालुक्यांतील गावे वेगवेगळ्या मतदारसंघांत विभागली गेल्याने निर्माण झालेली विसंगती दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. उदाहरणार्थ, बुलढाणा तालुक्यातील धाड, रायपूर आणि मासरूळ सर्कल सध्या चिखली मतदारसंघात असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या प्रस्तावात एकाच तालुक्यातील गावे त्याच मतदारसंघात ठेवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक नेतृत्वाचे प्रभावक्षेत्र नव्याने आखले जाऊ शकते.








