व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेत ‘ई-केवायसी’च्या नावाखाली फसवणूक

ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेत ‘ई-केवायसी’च्या नावाखाली फसवणूक

ladki-bahin-yojna-ekyc-scam-warning-deadline-extension-maharashtra-news : महिलांना सतर्कतेचे आवाहन, ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ जाहीर

Mumbai : महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन करत कोणत्याही आमिषाला किंवा फसव्या आश्वासनांना बळी पडू नये, असे स्पष्ट केले आहे.

राज्यात काही ठिकाणी ‘ई-केवायसी करून देतो’ किंवा ‘योजनेचा लाभ मिळवून देतो’ असे सांगून महिलांकडून पैसे उकळले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः नव्याने नोंदणी करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, सध्या या योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली असून अशा प्रकारच्या कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

Monsoon forecast : यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता

दरम्यान, आधीच नोंदणी केलेल्या लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रियेत राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची गरज नसून महिलांना स्वतःच्या मोबाईलद्वारे सहजपणे ई-केवायसी पूर्ण करता येते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच आवश्यक असल्यास जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

ई-केवायसीच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून जळगाव शहरात अशाच प्रकारातून महिलांचा छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट’ निकाल; वनमजुरांचा ८ महिन्यांचा वेतनाचा वनवास संपला

नागरिकांनी अशा फसवणुकीच्या प्रकारांबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी आणि केवळ अधिकृत मार्गानेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

__

error: Content is protected !!