व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vidhan parishad election : १० जागांसाठी एकाच दिवशी दोनदा मतदान, पोटनिवडणुकीत महायुतीचा...

Vidhan parishad election : १० जागांसाठी एकाच दिवशी दोनदा मतदान, पोटनिवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित

maharashtra-vidhan-parishad-election-2026-double-voting-byelection-twist : विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट

Mumbai महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ नियमित जागांसह एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने यंदाच्या निवडणुकीत अनोखा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एकूण १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत आमदारांना दोन स्वतंत्र प्रक्रियांतून एकाच दिवशी दोनवेळा मतदान करावे लागणार आहे.

या निवडणुकीत ९ जागांसाठी नियमित निवडणूक होणार आहे, तर काँग्रेसमधून राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत असताना ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात असून, भाजपकडून पुन्हा प्रज्ञा सातव यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते.

Forest officers bribe : लाच मागणाऱ्या दोन वनअधिकाऱ्यांना रंगेहात पकडले !

मतदान प्रक्रियेच्या दृष्टीने ९ जागांसाठी स्वतंत्र मतदान होईल, तर पोटनिवडणुकीसाठी वेगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे. ९ जागांसाठी विजयी होण्यासाठी २९ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे, तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी १४४ मतांचा कोटा आवश्यक राहणार आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांतील विजयी उमेदवारांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास हा कोटा अनुक्रमे २९ आणि १४५ पर्यंत जाऊ शकतो.

सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता आहे. १० पैकी ९ जागा महायुती सहज जिंकू शकते, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल मोठ्या प्रमाणात आधीच स्पष्ट झाल्याचे चित्र आहे.

Khamgao Politics : पोस्टरवर साथ साथ, प्रत्यक्षात ‘नो बात’; शिंदेसेनेचे ‘स्माईल पॉलिटिक्स’

या निवडणुकीत ज्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. या सर्वांच्या जागांसाठी नवे सदस्य निवडले जाणार असून, काहींना पुन्हा संधी मिळते की नव्या चेहऱ्यांना वाव दिला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dilip Sananda : सानंदा–सोनोने ‘गोड’ भेटीची खामगावात चर्चा; राजकीय भेट, की नवे समिकरण

निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल असून, अर्जांची छाननी २ मे रोजी होणार आहे. ४ मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दिली आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १३ मेपर्यंत पूर्ण होणार आहे.

एकूणच, यंदाची विधान परिषद निवडणूक ही केवळ आकड्यांची लढत न राहता मतदानाच्या दुहेरी प्रक्रियेमुळे आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकच रंगतदार ठरणार आहे.

___

error: Content is protected !!