Dispute in Shivsena over appointments of office-bearers; a covert battle for credit intensifies : पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून वाद, श्रेयवादासाठी छुपी लढाई
Khamgao समोरासमोर आरोप-प्रत्यारोप करणारे नेते आणि त्याच नेत्यांचे पोस्टरवर खांद्याला खांदा लावून हसरे चेहरे झळकणे, ही राजकारणातील जुनी पण नेहमीच रंगत वाढवणारी विसंगती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिंदेसेनेतील अलीकडील पदाधिकारी नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर कालपर्यंत एकमेकांवर शब्दांचे बाण सोडणारे काही स्थानिक नेते आता मात्र एकदिलाने पोस्टरवर झळकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पदाधिकारी निवडीवरून आणि श्रेयवादाच्या मुद्द्यावरून अलीकडच्या काळात पक्षातील काही गटांमध्ये उघड मतभेद समोर आले होते. “हे काम माझ्यामुळेच झाले”, “हा कार्यक्रम आमच्या गटामुळे यशस्वी झाला” अशा सूरांमुळे स्थानिक पातळीवर गटबाजीची चर्चा रंगली होती. मात्र जयंती उत्सवांच्या निमित्ताने शहरभर लागलेल्या पोस्टरवर हेच नेते एकत्र, हसतमुख आणि ऐक्याचा संदेश देताना दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Dilip Sananda : सानंदा–सोनोने ‘गोड’ भेटीची खामगावात चर्चा; राजकीय भेट, की नवे समिकरण
कालपर्यंत उघडपणे व्यक्त होणारे मतभेद एका रात्रीत खरंच मिटले का, की ही एकता केवळ पोस्टर आणि कॅमेऱ्यासमोरची औपचारिकता आहे, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विशेषतः श्रेयवादावरून ‘माझं-माझं’ करणारे नेते अचानक ‘आपलं-आपलं’ म्हणू लागल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांनाही नेमका संदेश काय घ्यायचा, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Vidarbha Farmers : मुलभूत सुविधांसाठी शेतकरी आक्रमक, बाजार समितीत आंदोलन
या घडामोडींमागे वरिष्ठ पातळीवरील समन्वयाचा दबाव आहे का, की आगामी स्थानिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीने ही तात्पुरती जवळीक साधली जात आहे, याबाबतही चर्चा सुरू आहे. काही जाणकारांच्या मते, उत्सव, जयंती आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमध्ये तात्पुरती सलोख्याची भाषा दिसते; मात्र प्रत्यक्ष संघटनात्मक निर्णयांच्या वेळी जुने मतभेद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता कायम असते. विशेषतः संजय अवताडे आणि इतर पदाधिकाऱ्यांमधील पूर्वीचे वाद, नियुक्त्यांवरील नाराजी आणि स्थानिक नेतृत्वाच्या स्पर्धेमुळे ही ‘पोस्टरवरील एकता’ किती काळ टिकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








