Political opportunism under the guise of a meeting; health issues politicized in Buldhana : आरोग्य सेवांची गुणवत्ता, सुविधांतील उणिवा आणि व्यवस्थापनातील त्रुटींवर चर्चा
Buldhana जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार धीरज लिंगाडे यांनी घेतलेल्या बैठकीमुळे बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेबरोबरच राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांच्या दालनात ‘आयएमए’च्या सदस्यांसोबत झालेल्या या बैठकीत आरोग्य सेवांची गुणवत्ता, सुविधांतील उणिवा आणि व्यवस्थापनातील त्रुटींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात या चर्चांचे ठोस परिणाम दिसतील का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. “बैठका होतात; पण बदल किती?” हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील मूलभूत समस्या अद्याप कायम असताना, केवळ बैठका घेऊन प्रशासनाची जबाबदारी संपते का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
Government employees on strike : १७ लाख कर्मचाऱ्यांचा एल्गार; कार्यालये ओस, जनतेची गैरसोय वाढली
विशेष म्हणजे, आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यापेक्षा बैठकींचेच प्रमाण वाढत असल्याची टीका होत आहे. रुग्णांना तातडीच्या सुविधा, औषधांचा तुटवडा, मनुष्यबळाची कमतरता यांसारख्या प्रश्नांवर प्रत्यक्षात उपाययोजना होण्याची गरज असताना, चर्चेपुरतीच मर्यादा राहते की काय, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
या बैठकीकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सक्रियता वाढविण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विविध घटकांना एकत्र आणून संवाद साधण्यामागे राजकीय संदेश देण्याचा हेतू असल्याचेही काहींचे मत आहे.
Democracy day : लोकशाही दिनाला नागरिकांचा संताप; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर तीव्र नाराजी
या बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होणार की त्या कागदावरच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केवळ चर्चा न करता ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. ही बैठक आरोग्य व्यवस्थेत खऱ्या अर्थाने बदल घडवते की केवळ राजकीय संदेश देऊन थांबते, यावरून पुढील काळात या उपक्रमाचे यश-अपयश ठरणार आहे.








