Delegation meets Deputy Chief Minister Sunetra Pawar for Nazer Kazi’s candidature : आमदार कायंदे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
Sindkhedraja बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अॅड. नाझेर काझी यांच्या विधान परिषद नियुक्तीसाठी legislative elections बारामती येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार DCM Sunetra Pawar यांच्याकडे मागणी केली. आमदार मनोज कायंदे MLA Manoj Kayande यांच्या नेतृत्वात गेलेल्या या शिष्टमंडळाने पक्षश्रेष्ठींकडे काझी यांच्या नावाचा जोरदार पाठपुरावा केला असून, या हालचालीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
२२ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध भागांतून निघालेल्या सुमारे ५० चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले. विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन काझी यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मागणी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी “काझी साहेबांना संधी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
Nitin Raut : नितीन राऊतांना धक्का; महापालिकेत केतन ठाकरे झाले ‘स्वीकृत’
बैठकीदरम्यान काझी यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा मांडणारी सुमारे आठ मिनिटांची चित्रफीत सादर करण्यात आली. अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष म्हणून काझी यांनी पक्षासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करत त्यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व देणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकजूट पाहता ही मागणी केवळ वैयक्तिक नसून संघटनात्मक असल्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देताना, “मला कोणालाही नाराज करायला आवडत नाही. प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली पद्धत असते. सर्वसमावेशक विचार करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची खात्री देते,” असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काझी समर्थकांना आशा निर्माण झाली असली, तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.








