व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legeslative election : नागपुरातून कुणाची लागणार लॉटरी? विधान परिषदेसाठी दयाशंकर तिवारी आणि...

Legeslative election : नागपुरातून कुणाची लागणार लॉटरी? विधान परिषदेसाठी दयाशंकर तिवारी आणि राजीव पोतदारांची नावे फायनल?

Dayashankar Tiwari and Rajiv Potdar likely to be finalised for Legislative Council : दोन्ही नावांची शिफारस दिल्लीला रवाना, ३० एप्रिलला अर्ज भरणार

Nagpur विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातून भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या नावांची शिफारस थेट केंद्राकडे करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून समजते. या दोन्ही नावांची शिफारस दिल्लीला पाठवण्यात आल्यामुळे नागपूर जिल्ह्याला एक हक्काचा आमदार मिळणार, हे आता जवळपास निश्चित झाले असून, आता केवळ या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दयाशंकर तिवारी हे भाजपचे निष्ठावान आणि कट्टर हिंदुत्वादी चेहरा म्हणून ओळखले जातात. नागपूर महापालिकेचे महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे. सुमारे चार दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्या तिवारींनी यापूर्वी मध्य नागपूरमधून निवडणूक लढवली होती, तर मागील निवडणुकीत त्यांनी पश्चिम नागपूरसाठीही प्रबळ इच्छा व्यक्त केली होती. संघटनेतील दांडगा अनुभव आणि शहरावरील पकड ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

Vijay Wadettiwar : ‘संजूला गंजू करू’; आमदार गायकवाडांच्या ‘पानसरे’ धमकीवरून वडेट्टीवार आक्रमक

दुसरीकडे, नागपूर ग्रामीणचे माजी अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या पोतदार यांनी गेल्या निवडणुकीत स्वतःची जागा आशिष देशमुख यांच्यासाठी सोडत पक्षादेश शिरसावंद्य मानला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी पोतदार यांनी पडद्यामागून महत्त्वाची सूत्रे हलवली होती. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कळमेश्वर येथील एका जाहीर कार्यक्रमात पोतदार यांच्या निष्ठेचे कौतुक केले होते.

Sunetra pawar : कुटुंबात ‘थ्री लेअर सिस्टीम’; पार्थ आणि जय पवारांवर महत्त्वाची जबाबदारी

पोतदार यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याचा सरकारने विचार करावा आणि त्यांना विधान परिषदेवर पाठवावे, असे जाहीर आवाहन गडकरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना केले होते. तेव्हापासूनच पोतदार यांचे पारडे जड मानले जात आहे. आता भाजप नेतृत्व शहराचा चेहरा म्हणून तिवारींना पसंती देते की गडकरींच्या आवाहनानुसार पोतदारांच्या निष्ठेचा सन्मान करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या निवडणुकीसाठी ३० एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे. हे बघता येत्या आठ दिवसाच्या आतच भावी आमदारांची नावे जाहीर होणार आहेत.

error: Content is protected !!