व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Pole of Poles : पाच राज्याच्या एक्झिट पोलचे मोठे अंदाज; बंगालमध्ये काय...

Pole of Poles : पाच राज्याच्या एक्झिट पोलचे मोठे अंदाज; बंगालमध्ये काय होणार?

exit-poll-five-states-election-bengal-assam-kerala-tamilnadu-puducherry-results-prediction : आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक, केजेरळ तामिळनाडूत सत्तांतराचे संकेत

Mumbai : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीने राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी येथे झालेल्या मतदानानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी मांडलेल्या अंदाजांनुसार अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांना आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. निकाल अधिकृतपणे ४ मे रोजी जाहीर होणार असले तरी सध्याच्या अंदाजांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला पुन्हा सत्तेची संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाजपने कडवी टक्कर दिली असली तरी पोल ऑफ पोल्सनुसार तृणमूल काँग्रेसला सुमारे १४७ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला जवळपास १३७ जागा मिळू शकतात. काँग्रेस आणि डावे पक्ष मर्यादित जागांवरच थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काही पोल्स नुसार भाजप येथे सत्ता स्थापन करेल असेही सांगण्यात येत आहे.

Vidhan parishad election : विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; ठाकरेंकडून दानवे यांना उमेदवारी

आसाममध्ये भाजप आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता असून सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याच्या दिशेने पक्षाची वाटचाल दिसत आहे. पोल ऑफ पोल्सनुसार भाजपला सुमारे ८८ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. इतर पक्षांना काही मोजक्या जागा मिळण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मात्र सत्तांतराचे संकेत मिळत आहेत. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडी सत्तेत येऊ शकते. पोल ऑफ पोल्सनुसार युडीएफला सुमारे ७७ जागा, तर एलडीएफला ५९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजप आणि इतर पक्षांना मर्यादित जागा मिळू शकतात.

तामिळनाडूमध्ये डीएमके आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोल ऑफ पोल्सनुसार डीएमके आघाडीला सुमारे १३० जागा मिळू शकतात, तर एआयएडीएमके आघाडीला ६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय यांच्या पक्षालाही काही प्रमाणात यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुदुचेरीमध्ये भाजप आघाडीचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. पोल ऑफ पोल्सनुसार भाजप आघाडीला सुमारे १७ जागा मिळू शकतात, तर काँग्रेस आघाडीला ९ जागांवर समाधान मानावे लागू शकते. इतर पक्षांना काही जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Sudhir mungantiwar : बियाणे कायद्यात शेतकरीहिताच्या कठोर सुधारणा करा; मंत्रालयात आमदार सुधीर मुनगंटीवारांचा बुलंद आवाज!

एकूणच, पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये बहुतेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांना फायदा होताना दिसत असला तरी केरळमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता अधोरेखित होत आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत होत असून अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!