व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Pakistan target killing : जैशचा कमांडर सलमान अजहर ठार, दहशतवादी संघटनांत खळबळ

Pakistan target killing : जैशचा कमांडर सलमान अजहर ठार, दहशतवादी संघटनांत खळबळ

pakistan-target-killing-salman-azhar-jaish-e-mohammed-commander-killed-bahawalpur : पाकिस्तानात ‘अज्ञात’ कारवायांचा सुळसुळाट

New Delhi : पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘टार्गेट किलिंग’च्या मालिकेमुळे दहशतवादी संघटनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच मालिकेत मौलाना सलमान अजहर याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा कमांडर मानला जाणारा सलमान अजहर बहावलपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बहावलपूरमध्ये असताना भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने सलमान अजहरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला. अधिकृतरीत्या या घटनेला अपघात म्हटले जात असले तरी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांकडून याकडे ‘टार्गेट किलिंग’ म्हणून पाहिले जात असल्याचे समजते. त्याचा दफनविधी बहावलपूरमधील ‘मर्कज सुभानअल्लाह’ येथे पार पडणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

Bacchu kadu : “धनुष्यबाण हाती घेतोय”; बच्चू कडूंचा मोठा निर्णय

दरम्यान, सलमान अजहर हा मसूद अजहर याचा निकटवर्तीय मानला जात होता आणि संघटनेच्या महत्त्वाच्या कारवायांमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची होती. त्याच्या मृत्यूमुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तानात अवघ्या ४८ तासांत दोन मोठ्या दहशतवादी नेत्यांचा खात्मा झाल्याने खळबळ उडाली आहे. २७ एप्रिल रोजी लष्कर-ए-तय्यबा या संघटनेच्या खैबर पख्तूनख्वा शाखेचा प्रमुख शेख युसूफ आफ्रिदी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते.

Sunetra Pawar, praful patel: राष्ट्रवादीत वादाची ठिणगी: प्रफुल्ल पटेलांना सुनेत्रा पवारांचा दणका!

सलमान अजहरच्या मृत्यूनंतर आणि त्याआधी आफ्रिदीच्या हत्येनंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. एकामागोमाग एक टॉप कमांडर्सचा खात्मा होत असल्याने या संघटनांची कार्यक्षमता कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे. ‘अज्ञात’ हल्लेखोरांच्या या कारवायांमुळे पाकिस्तानात लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांचे धाबे दणाणले असून, पुढील काळात अशा घटनांची मालिका सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!