dilip sananda, nazer kazi to wait for mlc : विधान परिषदेसाठी तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी लावली होती फिल्डींग
Buldhana जिल्ह्यातील महायुतीत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘तिकीट एक्सप्रेस’ धावणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती. अनेक इच्छुकांनी आपापल्या पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, उमेदवारांची घोषणा होताच ही ‘एक्सप्रेस’ निघून गेली आणि प्लॅटफॉर्मवर उभे असलेले इच्छुक तसेच उभे राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले.
राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून अॅड. नाझेर काझी आणि दिलीपकुमार सानंदा, तर भाजपकडून विजयराज शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेत जाण्याचे स्वप्न रंगवत होते. स्थानिक पातळीवर त्यांची राजकीय चाचपणी, संघटनबांधणी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याचे प्रयत्नही सातत्याने सुरू होते. त्यामुळे यंदा त्यांच्यापैकी एखाद्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती.
NCP Ajit Pawar : एक नाव पुढे, जिल्ह्यातील अनेकांची स्वप्ने धुळीस मिळाली
तिकीटासाठी इच्छुकांनी केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही धावपळ केल्याचे दिसून आले. काहींनी थेट दिल्ली आणि मुंबई दौरे करून वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला, शिष्टमंडळांच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. अनेक बैठकांचे फेरे, छायाचित्रे आणि चर्चांचा गाजावाजा झाला; मात्र अंतिम यादीत नाव न आल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्री तसेच इतर प्रभावी नेत्यांशी भेटीगाठी घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या नावाची शक्यता अधिक असल्याचे मानले जात होते. तरीही अंतिम क्षणी समीकरणे बदलली आणि त्यांच्या पदरातही निराशाच पडल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर इच्छुकांची सध्याची अवस्था ‘स्टँडबाय’सारखी झाली असून, पुढील संधीची प्रतीक्षा त्यांना करावी लागणार आहे. पक्षांतर्गत समीकरणे, जातीय-प्रादेशिक समतोल आणि आगामी राजकीय रणनीती यांचा विचार करूनच उमेदवारी दिली गेल्याचे जाणकारांचे मत आहे.
Water crisis : खामगावात ‘ड्राय रन’ कायम; पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापलं!
विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा अनेक इच्छुकांची ‘वेटिंग लिस्ट’ कायम राहिली आहे. मात्र, राजकारणात आशा कधीच संपत नाही, हेच या घडामोडीतून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे ‘यावेळी नाही तर पुढच्या वेळी’ या अपेक्षेवर इच्छुकांची नजर खिळून राहिली आहे.








